Vanraj Andekar Death News Saam TV
मुंबई/पुणे

Pune News : वनराज आंदेकर यांच्या हत्येचं धक्कादायक कारण उघड; गोळीबाराचा VIDEO आला समोर, तिघांना अटक

Vanraj Andekar Death News : वनराज आंदेकर यांच्या हत्येप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून तातडीने तपासाची चक्रे फिरवत तिघांना अटक केली आहे.

Satish Daud

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पुण्यातील माजी नगरसेवक वनराज आंदेकर यांच्यावर भररस्त्यात गोळीबार करण्यात आला. त्यानंतर कोयत्याने सपासप वार करत त्यांची हत्या करण्यात आली. पुण्यातील नाना पेठ परिसरात रविवारी रात्रीच्या सुमारास ही घटना घडली. याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून तातडीने तपासाची चक्रे फिरवत तिघांना अटक केली आहे.

आदेश वनकर यांच्या हत्येचं धक्कादायक कारणंही समोर आलं आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, पूर्ववैमनस्यातून निकटवर्तीयांनीच वनकर यांच्यावर गोळीबाद केला. कौटुंबिक वाद आणि पैशांच्या वादातून आरोपींनी त्यांची हत्या केली. सध्या पुणे पोलीस (Pune Police) तिन्ही आरोपींची कसून चौकशी करीत आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वनराज आंदेकर हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे माजी नगरसेवक होते. रविवारी संध्याकाळी (2 सप्टेंबर) साडेनऊ वाजेच्या सुमारास ते नाना पेठ परिसरात उभे होते. यावेळी आरोपी तिथे आले. त्यांनी आंदेकर यांच्यावर गोळीबार (Crime News केला. त्यानंतर कोयत्याने सपासप वार करून आरोपी घटनास्थळावरून फरार झाले.

हल्ला करण्यापूर्वी आरोपींनी परिसरातील लाईट देखील घालवली होती. हल्ला झाला त्यावेळी आंदेकर हे एकटेच होते. घरातील कार्यक्रम असल्यामुळे आंदेकर यांच्यासोबत इतर सहकारी नव्हते. नेमकी हीच संधी साधून दुचाकीवरून आलेल्या तीन ते चार जणांनी आधी त्यांच्यावर गोळ्या झाडल्या आणि त्यानंतर कोयत्यानं वार केले.

पुण्यात बारा तासात दुसरा खून

एकीकडे वनराज आंदेकर यांची हत्या झाल्याची घटना ताजी असतानाच पुण्यात बारा तासात दुसरी हत्या झाली. हडपसर परिसरात असलेल्या गाडीतळावर मध्यरात्री फायनान्स कंपनीच्या मॅनेजरचा खून करण्यात आळा. ⁠वासुदेव कुलकर्णी असे खून झालेल्या मॅनेजरचे नाव आहे. ⁠गाडीतळ परिसरात असलेल्या त्यांच्या घरासमोर शतपावली करताना अज्ञाताने धारदार शस्त्राने केला कुलकर्णी यांचा खून केलाय. याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून आरोपींच्या शोधात पथके रवाना केली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Raksha Bandhan 2026: २७ की २८ ऑगस्ट... यंदा राखी कधी बांधायची? भाऊ-बहिणीच्या सणाचा खरा शुभ मुहूर्त कोणता?

Skin Care: नॅचरल सॉफ्ट आणि ग्लोइंग त्वचेसाठी रोज प्या 'हे' जादुई ड्रिंक; चेहऱ्यावर दिसेल नैसर्गिक चमक

Coal Mine Explosion : कोळसा खाणीत भीषण स्फोट; ३० कामगारांचा मृत्यू, १० जण अद्याप अडकले

Maharashtra News Live Update: अतिवृष्टीचा फटका; बुलढाणा जिल्ह्यातील अनेक प्रमुख मार्ग बंद

Death News : सैराट फेम अभिनेत्याच्या वडिलांचं निधन! ब्रेनहॅमरेजमुळे घेतला अखेरचा श्वास

SCROLL FOR NEXT