Pubs in Pune: Section 144 In Pune Know The Reason Behind It Saam tv
मुंबई/पुणे

Section 144 In Pune: पुणेकरांसाठी मोठी बातमी! शहरात १४४ कलम लागू, कारण काय?

Vishal Gangurde

Latest Update on Bar, Pubs in Pune:

पुणेकरांसाठी महत्वाची बातमी हाती आली आहे. पुणे शहरात १४४ कलम लागू करण्यात आला आहे. शहरात विविध कायदे , नियम तसेच न्यायालयीन आदेश यांची प्रभावी काटेकोरपणे अंमलबजावणी करण्यासाठी १४४ कलम लागू करण्यात आला आहे. पुणे पोलीस प्रशासनाकडून ३१ मार्चपर्यंत कलम १४४ लागू राहणार आहे. (Latest Marathi News)

मिळालेल्या माहितीनुसार, पुणे पोलीस प्रशासनाकडून शहरात १४४ कलम लागू केला आहे. शहरात १४४ कलम लागू करत शहरातील इमारतींच्या टेरेसवरील बेकायदेशीर अनधिकृत पब, टेरेस हॉटेल आणि बेकायदेशीररित्या चालणाऱ्या अवैध धंद्यावर कारवाई कडक कारवाई करण्यात येणार असल्याची माहीत पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी यापूर्वीच वेळावेळी दिलेली आहे. त्याच पार्श्वभूमीवर पोलिस आयुक्त कार्यालयात हॉटेल मालक व चालक यांची बैठक झाली.

पुणे पोलीस प्रशासनाकडून शहरातील कायदे, न्यायालयीन आदेशांची प्रभावी काटेकोरपणे अंमलबजावणी व्हावी म्हणून त्याअनुषंगाने सीआरपीसी कलम 144 प्रमाणे सुधारित निर्देश देण्यात आले आहेत. पुणे पोलीस प्रशासनाचे आदेश हे ३१ मार्च २०२४ पर्यंत १४४ लागू राहणार आहेत.

काही दिवसांपूर्वी पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी पत्रकार परिषद घेऊन बार, पब्स रात्री दीड वाजल्यानंतर सुरू ठेवल्यास कठोर कारवाई करणार असल्याचे सांगितलं होतं. त्यानुसार पुण्यातील बार, पब्स, रेस्टॉरंट मालक आणि चालकांना कलम १४४ अंतर्गत आदेश दिले आहेत.

पुणे शहरातील हुक्का पार्लर बंद

पुणे शहरातील सर्व हुक्का पार्लर बंद करण्यात येत आहेत. पोलिसांकडून पब्स, रेस्टॉरंटमध्ये हुक्का सेवन आणि विक्री करण्यांवर कठोर कारवाई करण्यात येणार आहे. काही दिवसांपूर्वी पुणे पोलिसांनी तब्बल ४ कोटी रुपयांचे अंमली पदार्थ जप्त केले होते. या घटनेनंतर पुण्यात एकच खळबळ उडाली होती.

पुणे पोलीस अलर्ट मोडवर

पुणे शहरातील पोलीस ठाण्यात ५ वर्षांपेक्षा जास्त कार्यकाळ पूर्ण केलेल्या प्रत्येक पोलीस कर्मचाऱ्यांची बदली करण्यात येणार असल्याचीही माहिती पोलीस आयुक्तांनी दिली होती. पोलीस अधिकारी जर एकच ठिकाणी ३ वर्षांपासून असेल, त्याचा कार्यकाळ पूर्ण झाल्यानंतरही तिथेच असेल, तर त्याची सुद्धा बदली केली जाईल, असंही त्यांनी सांगितलं होतं. तसेच गुन्हेगारी प्रवृत्तीचे व्हिडिओ सोशल मीडियावर अपलोड करणाऱ्या ५० सोशल अकाउंटवर कारवाई केली आहे, अशी माहिती पुणे पोलीस आयुत्त अमितेश कुमार यांनी दिली होती.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Haryana Election Exit Poll Result : हरियाणात काँग्रेस ५०, भाजप १५ तर 'आप'ला शून्य जागा; एक्झिट पोलची आश्चर्यचकित करणारी आकडेवारी

२ चिमुकली मुलं, अंबरनाथमधून गायब, कल्याणमधून अपहरण अन् पालघरला थरार...

National Park: प्राणी प्रेमींनो! भारतातील 'ही' राष्ट्रीय उद्याने पाहिलीत का?

Jammu Kashmir Exit Polls : जम्मू-काश्मीरमध्ये येणार 'इंडिया आघाडी'चं सरकार, भाजपला बसणार धक्का? जाणून घ्या EXIT POLL चा अंदाज

Marathi News Live Updates :हरियाणात १० वर्षांनंतर काँग्रेस रिटर्न, जम्मूत भाजपची सत्ता; एक्झिट पोलचे आकडे आले

SCROLL FOR NEXT