Pune Police take action against three US tourists for alleged visa violation and religious pamphlet distribution. साम टीव्ही मराठी पुणे बातम्या
मुंबई/पुणे

Pune : पुण्यातील ३ अमेरिकन नागरिकांना भारत सोडण्याचे आदेश, धक्कादायक कारण आले समोर

Pune police news today : पुण्यात फिरण्यासाठी आलेल्या ३ अमेरिकन नागरिकांना तात्काळ देश सोडण्याचे आदेश देण्यात आले आहे. धार्मिक प्रचार करताना दिसल्यानंतर पुणे पोलिसांनी तात्काळ कारवाई केली.

Akshay Badve

Pune Sadashiv Peth Pune news Update : पुण्यातील सदाशिव पेठेत चक्क ख्रिश्चन धर्माचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी आलेल्या तीन अमेरिकन पर्यटकांना पुणे पोलिसांनी देश सोडण्याचे आदेश दिले आहेत. टुरिस्ट व्हिसावर येऊन धार्मिक मजकूर असलेले पॅम्फलेटचे वाटप करणाऱ्या तीन अमेरिकन नागरिकांवर करावी करण्यात आली आहे. जेम्स हडसन, फ्रान्त्झ थॉमस आणि गॅरी जीन असे या तिघांची नावं आहेत. येत्या १० मे २०२६ पर्यंत भारत देश सोडण्याचे आदेश देण्यात आले.

२६ एप्रिल रोजी ते पुणे शहरातील सदाशिव पेठेत त्यांनी त्यांच्याकडील पॅम्फलेट नागरिकांना वाटायला सुरुवात केली. मराठी, हिंदी आणि इंग्रजी भाषेत असलेल्या या पॅम्फलेट वर "जग इतके विभागलेले का आहे" असा मजकूर लिहिण्यात आला होता. तसेच या तिघांनी धर्मांतरासाठी प्रवृत्त करण्यासाठी "येशू हा देव सर्वात मोठा आहे, त्याच्याशिवाय दुसरं कोणी नाही", असं सुद्धा त्यावर लिहिण्यात आलं होतं.

पुण्यातील शुक्रवार पेठ भागात धर्मांतराचा प्रयत्न करत असल्याचे आले निदर्शनास आले. "जग इतके विभागलेले का आहे?" अशा मजकुराचे पॅम्फलेट धर्माचा प्रचार वाटून करत होते. पुण्यातील खडक पोलिस ठाण्यात या तीन अमेरिकन नागरिकांवर अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जेम्स हडसन (६५), फ्रान्त्झ थॉमस (५३) आणि गॅरी जीन (६४) असे या तिघांची नावे आहेत.

२६ वर्षीय ड्रायव्हरने पुणे पोलिसात तक्रार दिल्यानंतर हा सगळा प्रकार समोर आला. मिळालेल्या माहितीनुसार, हे तिघे ही जणं अमेरिकेचे नागरीत्तव असलेले पर्यटक टुरिस्ट व्हिसा वर भारतात आले आणि त्यानंतर पिंपरी येथील एका हॉटेल मध्ये ते वास्तव्यास होते. २६ एप्रिल रोजी ते पुणे शहरातील शुक्रवार पेठेत आले. त्यावेळी त्यांनी त्यांच्याकडील पॅम्फलेट नागरिकांना वाटायला सुरुवात केली. मराठी, हिंदी आणि इंग्रजी भाषेत असलेल्या या पॅम्फलेट वर "जग इतके विभागलेले का आहे" असा मजकूर लिहिण्यात आला होता.

तसेच या तिघांनी धर्मांतरासाठी प्रवृत्त करण्यासाठी "एका विशिष्ट धर्माचा देव सर्वात मोठा आहे, त्याच्याशिवाय दुसरं कोणी नाही", असा सुद्धा प्रचार केला. हे अनुभवलेल्या एका चालकाने थेट पोलिसांना याची माहिती दिली आणि त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. हा सगळा प्रकार पुणे पोलिसांच्या एफआरओ ( फॉरेनर्स रीजनल रजिस्ट्रेशन ऑफिस) यांच्या समोर आल्यानंतर त्यांनी या तिघांना देश सोडून जाण्यासाठी नोटीस बजावली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

sugarcane juice: ऊसाचा रस प्यायल्याने रक्तातील शूगर वाढते का?

20 हजार कोटींची ‘ट्युशन फॅक्टरी’; कोचिंगचा गोरखधंदा, विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी खेळ

Petrol-Diesel Rate Rise: आठवडाभरात पेट्रोल-डिझेलची दुसऱ्यांदा दरवाढ; शेतकरी आणि सामान्यांच्या संतापाचा उद्रेक

7 वर्षांपासून सुरू NEET पेपर चोरी? मोटेगावकरसाठी कुलकर्णी फोडायचा पेपर?

खेळता-खेळता लिफ्टमध्ये गेला अन् दोन मजल्यांमध्ये अडकला; ७ वर्षीय मुलाचा मृत्यू, पुण्यातील धक्कादायक घटना

SCROLL FOR NEXT