MOSHI BUILDING COLLAPSE: ILLEGAL FLOORS ALLEGED AT PCMC GARBAGE DEPOT, 8 WORKERS STILL TRAPPED Saam tv
मुंबई/पुणे

Pune : पुण्यातील मोशी दुर्घटनेला ६४ तास झाले, पण ८ जण अजूनही ढिगाऱ्याखाली, धक्कादायक माहितीही आली समोर

Moshi Building Collapse Update : पिंपरी-चिंचवडमधील मोशी कचरा डेपोतील प्रशासकीय इमारत कोसळल्याप्रकरणी धक्कादायक माहिती समोर आली आहे. तळमजल्याचीच परवानगी असताना दोन अतिरिक्त मजले बांधल्याची चर्चा रंगली आहे.

Alisha Khedekar

  • मोशी कचरा डेपोतील प्रशासकीय इमारतीवर कचऱ्याचा ढिगारा कोसळून दुर्घटना

  • दुर्घटनेला ३ दिवस उलटूनही ८ कामगार अजूनही अडकल्याची भीती

  • NDRF कडून बचाव कार्य सुरु

गोपाल मोटघरे, पुणे

पुण्यात पिंपरी-चिंचवडमधील मोशी येथे बुधवारी एक भीषण दुर्घटना घडली. महापालिकेच्या कचरा डेपो प्रशासकीय इमारत जमीनदोस्त झाली. या इमारतीत २३ कामगार काम करत होते. इमारत कोसळल्याने कचऱ्याच्या ढिगाऱ्याखाली कामगार अडकले. या दुर्घटनेचा आज तिसरा दिवस उजाडला असून बचावकार्य अजूनही युद्धपातळीवर सुरू असून ढिगाऱ्याखाली ८ कामगार अडकल्याची भीती आहे. राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल (NDRF), अग्निशमन दल आणि इतर यंत्रणांकडून ढिगाऱ्याखाली अडकलेल्या कर्मचाऱ्यांचा शोध घेण्यासाठी अथक प्रयत्न केले जात आहेत.

दुर्घटनाग्रस्त इमारतीचे २ मजले बेकायदेशीर

धक्कादायक म्हणजे महापालिकेच्या बांधकाम विभागाने संबंधित इमारतीला केवळ तळमजला बांधण्याची परवानगी देण्यात मात्र, त्यावरील आणखी दोन मजले बेकायदेशीरपणे उभारण्यात आल्याची बाब आता चर्चेत आली आहे. या नव्या खुलाशामुळे दुर्घटनेच्या कारणांबाबत गंभीर प्रश्न निर्माण झाले आहेत.

महापालिकेच्या आयुक्तांचं मत काय?

मात्र, महापालिका अधिकारी याबाबत स्पष्ट माहिती देण्यास नकार देत आहेत. इमारत अनधिकृत होती का, परवानगी कोणी दिली, अनधिकृत होती तर कारवाई का नाही केली, या प्रश्नांची उत्तरे देण्यास अधिकारी टाळाटाळ करीत आहेत. दुर्घटनेनंतर पिंपरी-चिंचवड महापालिकेचे आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी ही घटना नैसर्गिक आपत्तीमुळे घडल्याचे मत व्यक्त केले होते. मात्र, इमारतीच्या मंजुरी आणि बांधकामासंदर्भातील माहिती समोर आल्यानंतर त्यांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.

त्या दिवशी नेमकं काय घडलं?

पुण्यात जवळपास मागील ८ दिवस पावसाने दमदार हजेरी लावली. या मुसळधार पावसात पिंपरी चिंचवडमधील मोशी येथे ८ जुलै रोजी दुपारी २च्या सुमारास कचऱ्याचा ढिगारा शासकीय इमारतीवर कोसळून इमारत जमीनदोस्त झाली. दुर्घटनेवेळी या इमारतीत २३ कामगार काम करत होते. सुदैवाने त्यातील ५ कामगारांच्या ही घटना लक्षात आल्याने त्यांनी मिळेल तो मार्ग पकडून इमारतीबाहेर उड्या मारत जीव वाचवला. इतर कामगार मात्र कचऱ्याच्या ढिगाऱ्याखाली अडकले. त्यातील उर्वरित कामगारांना बाहेर काढण्यात यश आले असून एकाचा मृत्यू झाला आहे. तर घटना घडून ३ रा दिवस उलटून देखील ८ जण अजूनही ढिगाऱ्याखाली अडकलेले आहेत. त्यांना बाहेर काढण्यासाठी NDRF च पथक अहोरात्र काम करत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: पुणे- खडकवासला धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू

Lohagad fort Video : लोहगड किल्ल्यावर पर्यटकांनी केलं धुम्रपान; शिवप्रेमींचा दणका, व्हिडिओ व्हायरल

Abhijeet Dipke Video : पोलीस अधिकाऱ्यांनी आंदोलक मुलींचे कपडे फाडून मारहाण केली; अभिजीत दिपके काय काय म्हणाले?

Accident : लष्करी तळाजवळ भीषण अपघात; मेजरचा जागीच मृत्यू, लेफ्टनंट दर्जाचे २ अधिकारी गंभीर जखमी, नेमकं काय घडलं?

Kidney Damage : सावधान! हाय BP मुळे निकामी होतेय किडनी; ही धोक्याची चिन्हे दुर्लक्षित करू नका

SCROLL FOR NEXT