National Defence Academy Cadet Ends Life Saam
मुंबई/पुणे

NDA च्या विद्यार्थ्याने आयुष्य संपवलं, खोलीत लटकलेल्या अवस्थेत आढळला मृतदेह; पुण्यात खळबळ

National Defence Academy Cadet Ends Life: राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीमध्ये शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यानं उचललं टोकाचं पाऊल. आत्महत्या करण्यामागचं कारण अस्पष्ट. तपास सुरू.

Bhagyashree Kamble

  • माजी सैनिकाच्या मुलानं आयुष्य संपवलं.

  • तरूण राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीमध्ये शिक्षण होता.

  • आत्महत्या करण्यामागचं कारण अस्पष्ट.

पुण्यातून एक धक्कादायक बातमी समोर येत आहे. राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीमध्ये शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यानं आत्महत्या केली आहे. हा तरूण मुळचा उत्तर प्रदेशमधील रहिवासी असल्याची माहिती आहे. आज पहाटे तरूणानं खोलीत गळफास लावून आयुष्य संपवलं. दरम्यान, आत्महत्या करण्यामागचं कारण काय? याची अद्याप माहिती समोर आलेली नाही. सध्या तपास सुरू आहे.

अतंरिक्ष कुमार (वय वर्ष १८) असे तरूणाचे नाव आहे. हा तरूण मुळचा उत्तर प्रदेशातील लखनौ जिल्ह्यातील एका गावातील रहिवासी आहे. त्याचे वडील माजी सैनिक आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, तो सध्या पुण्यातील राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी (NDA) मध्ये शिक्षण घेत होता. जुलै महिन्यात त्याने एन डी एमध्ये प्रवेश घेतला होता. अंतरिक्ष पहिल्या सत्रात शिकत होता.

पोलिसांनी दिलेल्या प्राथमिक माहितीनुसार, आज पहाटे अंतरिक्षने त्याच्या खोलीतील बेडशीटने गळफास लावून आत्महत्या केली. याची माहिती मिळताच पोलिसांना कळवण्यात आले. पोलिसांनी सध्या मृतदेह ताब्यात घेतला आहे. तसेच अंतरिक्षच्या कुटुंबालाही माहिती देण्यात आली.

अंतरिक्षने आत्महत्या का केली? आत्महत्या करण्यामागचं कारण काय? याची माहिती अद्याप समोर आलेली नाही. त्याच्या खोलीतून सुसाईड नोटही सापडली नाही. सध्या उत्तमनगर पोलिसांकडून अधिक तपास सुरू आहे. दरम्यान, या घटनेनंतर परिसरात खळबळ उडाली आहे. या घटनेनंतर अतंरिक्ष कुमार या तरूणाच्या कुटुंबावर दुखा:चा डोंगर कोसळला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Urine Infection : पुन्हा पुन्हा युरिन इन्फेक्शन होतंय? महिलांनो! जाणून घ्या नेमकं कारण अन् टाळा 'या' चुका

Maharashtra News Live Update: OBCच्या हक्काला धक्का नाही – उदय सामंत

Kitchen Hacks : लाकडी चॉपिंग बोर्ड धुतल्यानंतरही दुर्गंधी येतेय? या घरगुती उपायांनी करा डीप क्लीन

Weight Loss : लाइफस्टाइलमध्ये करा 'हे' ३ बदल; फक्त ३० दिवसांत वजन होईल कमी अन् दिसाल सडपातळ

8th Pay Commission: केंद्रीय पेन्शनधारकांसाठी मोठी बातमी! ₹22,450 पेन्शन वाढून ₹57,697 होणार? जाणून घ्या संपूर्ण गणित

SCROLL FOR NEXT