Pune Accident Saam Tv
मुंबई/पुणे

Pune Accident: सुसाट बाईक पळवली, नियंत्रण सुटल्याने विजेच्या खांबला धडकला; तरुणाचा जागीच मृत्यू

Pune News: अपघातामधील मृत तरुण आणि जखमी तरूण जळगावचे आहेत. जखमी झालेल्या तरुणावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. याप्रकरणी उत्तमनगर पोलिस ठाण्यात गुन्हा करण्यात आला आहे.

Priya More

सागर आव्हाड, पुणे

पुण्यामध्ये बाईकला झालेल्या भीषण अपघातामध्ये एका तरुणाचा मृत्यू तर एक जण गंभीर जखमी झाल्याची घटना घडलीये. भरधाव बाईकवरील ताबा सुटून ती विजेच्या लोखंडी खांबाला धडकली. शुक्रवारी मध्यरात्री दोन वाजताच्या सुमारास खडकवासला परिसरातील कुडजे येथे हा अपघात झाला. अपघातामधील मृत तरुण आणि जखमी तरूण जळगावचे आहेत. जखमी झालेल्या तरुणावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. याप्रकरणी उत्तमनगर पोलिस ठाण्यात गुन्हा करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, यशोधन अविनाश देशमुख (२३ वर्षे) याचा अपघातामध्ये मृत्यू झाला. तर त्याचा मित्र हर्षल दिपक पाटील (२४ वर्षे) हा अपघातामध्ये गंभीर जखमी झाला आहे. हे दोन्ही तरुण जळगावचे असून पुण्यातील बावधनमधील पेंबल्स अर्बनीया सोसायटीमध्ये राहतात. यशोधन आणि हर्षल हे खडकवासला (Khadakwasala) परिसरात फिरायला गेले होते. यावेळी यशोधन सुसाट बाईक चालवत होता. त्याचे बाईकवरील नियंत्रण सुटले आणि अपघात झाला.

कुडजे गावाहून मुख्य रस्त्याने पुढे आगळंबे फाट्याकडे जाताना साहिल हॉटेलच्या जवळ यशोधनचा बाईकवरील ताबा सुटला. त्याची बाईक विजेच्या लोखंडी खांबाला जाऊन जोरात धडकली. या अपघातामध्ये यशोधनच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली आणि त्याचा जागीच मृत्यू झाला. तर हर्षल गंभीर जखमी झाला. या अपघातामध्ये बाईकचे नुकसान झाले. त्याचसोबत विजेचा खांब वाकला, अशी माहिती उत्तमनगर पोलिसांनी दिली.

गंभीर जखमी झालेल्या हर्षल पाटीलवर खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. यशोधनच्या मृतदेहावर ससून रुग्णालयात शवविच्छेदन करण्यात आले. त्यानंतर त्याचा मृतदेह नातेवाईकाच्या ताब्यात देण्यात आला. चाळीसगावमधील गावामध्ये त्याच्या मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्यात आले. उत्तमनगर पोलिस या प्रकरणाचा तपास करत आहे. या घटनेमुळे यशोधनच्या कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Gairan Land: मनपा-नगरपालिका क्षेत्रातील गायरान जमिनीवरील आरक्षण उठवलं; सरकारचा मोठा निर्णय

US–Iran Conflict: अमेरिका-इराण युद्ध धर्मिक वळणार? डोनाल्ड ट्रम्प यांचा धर्मयुद्धाचा प्लॅन?

Ajit Pawar Plane Crash: जय पवारांची पत्रकार परिषद रद्द? VSR च्या मालकाचा 'बोलविता धनी' कोण?

कुत्र्याने चावा घेतल्याने म्हैस आक्रमक, अनेकांना जमिनीवर पाडलं, हल्ल्यात एकाचा मृत्यू

गाढवं पाळा, तरुण आणि श्रीमंत व्हा? गाढवाच्या कातडीपासून बनतं चमत्कारी औषध?

SCROLL FOR NEXT