Woman Body Found In Water Tanker At Pune Saam Tv
मुंबई/पुणे

Pune News: पाण्याच्या टँकरमध्ये आढळला महिलेचा मृतदेह, फुरसुंगीमध्ये खळबळ; नेमकं काय घडलं?

Woman Body Found In Water Tanker At Pune: पुण्यातल्या फुरसुंगमध्ये पाण्याच्या टँकरमध्ये महिलेचा मृतदेह आढळल्यामुळे खळबळ उडाली आहे. पोलिसांकडून याप्रकरणाचा तपास सुरू आहे.

Priya More

सागर आव्हाड, पुणे

पुण्यातून धक्कादायक बातमी (Pune News) समोर येत आहे. पाण्याच्या टँकरमध्ये महिलाचा मृतदेह आढळल्यामुळे खळबळ उडाली आहे. पुण्याच्या फुरसुंगीमध्ये ही घटना घडली आहे. टँकरमधून पाणी सोडत असताना हा प्रकार उघड झाला आहे. या घटनेची माहिती मिळताच कोंढवा पोलिसांनी (Kondhwa Police) घटनास्थळी धाव घेत तपास सुरू केला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, पुण्यातील फुरसुंगीमध्ये पाण्याच्या टँकरमध्ये महिलेचा मृतदेह आढळला. फुरसुंगी येथील पॉवर हाऊसजवळ पाणी सोडत असताना हा धक्कादायक प्रकार उघड झाला आहे. पाण्याच्या टँकरमध्ये महिलेचा मृतदेह आढळल्यामुळे खळबळ उडाली आहे. कौशल्या मुकेश चव्हाण असं या मृत महिलेचे नाव आहे. या महिलेची हत्या झाली की तिने आत्महत्या केली यामागचे कारण अद्याप समजू शकले नाही.

स्थानिकांनी घटनेची माहिती पोलिसांना दिली असता कोंढवा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. या प्रकरणाचा तपास पोलिसांकडून सुरू आहे. कौशल्या चव्हाण या हरवल्याची तक्रार कोंढवा पोलिस ठाण्यात दाखल करण्यात आली होती. पोलिस या महिलेचा शोध घेत होते. अशामध्ये या महिलेचा मृतदेह सापडल्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. याप्रकरणाचा पोलिसांकडून तपास सुरू आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: कणकवलीतील घोणसरीचा मनमोहक धबधबा झाला प्रवाहित

School Holiday: शाळा- महाविद्यालयांना सुट्टी जाहीर, पालघर जिल्हा प्रशासनाचा मोठा निर्णय

Suraj Chavan : गुलाबी गाऊन अन् मोकळे केस; सूरज चव्हाणच्या बायकोचे मॅटर्निटी फोटोशूट पाहिलंत का? VIDEO व्हायरल

IND vs ENG: टीम इंडिया 76 रन्सवर गारद! इंग्लंडविरूद्धच्या लाजीरवाण्या पराभवासाठी हे 5 खेळाडू जबाबदार

Rain Alert: राज्यात आजही अतिवृष्टी, वादळी-वाऱ्यासह पावसाचा अंदाज; पुढचे २४ तास महत्वाचे; कोणत्या जिल्ह्यांना अलर्ट?

SCROLL FOR NEXT