Pune Husband Wife Crime News  Saam TV
मुंबई/पुणे

Pune News : पती गाढ झोपेत, पत्नीने मध्यरात्री प्रियकराला घरी बोलावलं; भयानक हत्याकांडाने पुणे हादरलं

Pune Husband Wife Crime News : अनैतिक संबंध कायम ठेवता यावे यासाठी एका महिलेने प्रियकराच्या मदतीने आपल्या पतीचा गळा दाबून खून केला. त्यानंतर नवऱ्याने आत्महत्या केल्याचा बनाव सर्वांसमोर केला.

Satish Daud

सचिन जाधव साम टीव्ही

अनैतिक संबंध कायम ठेवता यावे यासाठी एका महिलेने प्रियकराच्या मदतीने आपल्या पतीचा गळा दाबून खून केला. त्यानंतर नवऱ्याने आत्महत्या केल्याचा बनाव सर्वांसमोर केला. मात्र, पोलिसांनी तातडीने तपासाची चक्रे फिरवत गुन्ह्याचा छडा लावला. हा धक्कादायक प्रकार पुणे शहरातील कात्रज परिसरात घडला. याप्रकरणी पोलिसांनी आरोपी महिलेसह तिच्या प्रियकराला अटक केली आहे.

गोपीनाथ बाळू इंगुळकर (वय ३७, रा. सच्चाई माता मंदिराजवळ, कात्रज) असे खून झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. या प्रकरणी पोलिसांनी राणी गोपीनाथ इंगुळकर (वय ३२) आणि नितीन शंकर ठाकर (वय ४५, रा. कुरण, ता. वेल्हा, जि. पुणे) या दोन आरोपींना अटक केली आहे. या घटनेनं कात्रज परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मृत गोपीनाथ हा मार्केटयार्डात हमालीचे काम करीत होता. त्यांची पत्नी राणी एका वसतिगृहात साफसफाईचे काम करते. यादरम्यान राणीचे ठाकर याच्यासोबत सूत जुळले. दोघांनी अनेकवेळा अनैतिक संबंध प्रस्थापित केले. याची कुणकुण राणीच्या पतीला लागली. त्याने पत्नीसोबत वाद घालण्यास सुरुवात केली.

दरम्यान, पती अनैतिक संबंधात अडसर ठरत असल्याने पत्नी राणी हिने त्याचा काटा काढण्याचा प्लान आखला. यासाठी तिने प्रियकर ठाकर याची मदत घेतली. रविवारी मध्यरात्री गोपीनाथ हा राहत्या घरी गाढ झोपला होता. घरात दुसरे कुणीही नसल्याची संधी साधत राणीने प्रियकराला घरी बोलावले.

दोघांनी मिळून गोपीनाथ याचा गळा दाबून खून केला. त्यानंतर पतीने आत्महत्या केल्याचे राणीने पोलिसांना कळविले. त्यावरून भारती विद्यापीठ पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली. मृतदेह शवविच्छेदनासाठी ससून रुग्णालयात पाठविला. शवविच्छेदन अहवालात गोपीनाथ यांचा गळा दाबून खून केल्याचे समोर आले. याप्रकरणी पोलिसांनी दोन्ही आरोपींना अटक केली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

IND vs ENG Test 2 Day 3: All Out! सिराजच्या भेदक माऱ्यापुढे इंग्लंडची टीम ढेपाळली; भारताकडे 180 धावांची आघाडी

Sushil Kedia : आमच्यासारखा जर खरंच पेटून उठला तर...व्यावसायिक सुशील केडिया यांनी राज ठाकरेंना डिवचलं

ठाकरेंच्या मेळाव्याला काँग्रेस-राष्ट्रवादीची दांडी? ठाकरेंच्या मेळाव्यात मविआचा सहभाग? मराठीवरून मविआत फूट?

Maharashtra Politics : मुंबईत होणार मराठीची एकजूट; ठाकरेंची युती, महायुतीला धडकी? Video

Ladki Bahin Yojana: महिलांना कधी मिळणार जूनचा हप्ता? आदिती तटकरेंनी थेट तारीखच सांगितली

SCROLL FOR NEXT