Swapnil Garad Saam TV
मुंबई/पुणे

Vishwas Nangre Patil : गड आला पण सिंह गेला! स्वप्निल गरड यांच्या निधनावर विश्वास नांगरे पाटलांची भावनिक पोस्ट

Swapnil Garad News : स्वप्निल गरड यांना हाय अल्टिट्यूड सेरेब्रल ओडेमा (HECO) मुळे खूप त्रास झाल्याने त्यांचा निधन झालं आहे.

साम टिव्ही ब्युरो

Pune News : पुणे पोलीस दलातील पोलीस कॉन्स्टेबल स्वप्निल गरड यांचा एव्हरेस्ट शिखर सर केल्यानंतर परतताना निधन झालं आहे. एव्हरेस्ट शिखर सर केल्यानंतर गरड यांना हाय अल्टिट्यूड सेरेब्रल ओडेमा (HECO) मुळे खूप त्रास झाल्याने त्यांचा निधन झालं आहे.

स्वप्नील गरड यांच्या पार्थिवावर रविवार सकाळी मुंढवा येथील स्मशानभूमीत शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले होते.  (Pune News)

ACBचे अतिरिक्त पोलील महासंचालक विश्वास नांगरे पाटील यांनी देखील स्वप्निल गरड यांना श्रद्धांजली वाहिली आहे. गड आला पण सिंह गेलं असं विश्वास नांगरे पाटील यांनी म्हटलं आहे.

विश्वास नांगरे पाटील यांची पोस्ट

विश्वास नांगरे पाटील यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटलं की, पोलीस हेड कॉन्स्टेबल स्वप्नील गरड याने जिद्द आणि धैर्याने एव्हरेस्ट शिखर सर केले. मात्र दुर्दैवाने त्याला शिखरावर गेल्यानंतर हाय अल्टिट्यूड सेरेब्रल ओडेमा (HECO) मुळे खूप त्रास झाला आणि काठमांडू येथील रुग्णालयात त्याचा मृत्यू झाला. (Latest News)

स्वप्निल एक अतिशय प्रामाणिक पोलीस, नम्र माणूस आणि महान गिर्यारोहक होता. मला त्याच्या डोळ्यातील सर्वात मोठी उंची गाठण्यासाठीची आकांक्षा आणि स्वप्ने स्पष्टपणे आठवतात. त्यांच्या आत्म्याला शांती लाभो.

हा असह्य धक्का आहे. या धक्क्यातून सावरण्यासाठी ईश्वर त्यांच्या कुटुंबियांना शक्ती देवो. आम्हा महाराष्ट्र पोलिसांना तुझा अभिमान आहे. स्वप्नील तुझे नाव दलातील शूर योद्ध्यांच्या यादीत कोरले गेले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

पितृपक्षात सोनं खरेदी करावे की नाही? जाणून घ्या

Bank Scam : ६५० कोटींचा बँक घोटाळा! डान्सरवर दरमहा उडवायचा १० लाख रुपये; CBI ने 'या' मास्टरमाइंडला ठोकल्या बेड्या

Pneumonia in Children: खोकला, ताप आणि श्वास घेण्यास त्रास? मुलांमध्ये न्यूमोनियाची ही लक्षणं वेळीच ओळखा

Maharashtra News Live Update: मुख्यमंत्र्यांकडून एमपीएससी विद्यार्थ्यांच्या मागण्या मान्य

Maharashtra Fort : शिखरावरचं रहस्यमय शिल्प! दुरून माणसासारखा दिसतो 'हा' किल्ला

SCROLL FOR NEXT