Pune Corporation Saam Tv
मुंबई/पुणे

Pune News: गाव विकणे आहे! पुण्यातील ३२ गावांनी काढली जाहिरात,नेमकं कारण काय?

Pune 32 Villages For Sale Advertisement: पुणे महानगरपालिकेमध्ये येणाऱ्या ३२ गावांमधील ग्रामस्थ आक्रमक झाले आहेत. या ग्रामस्थांनी गावं विकण्याचा निर्णय घेतला असून यासंदर्भात बॅनर्स लावले आहेत.

Priya More

सागर आव्हाड, पुणे

पुण्यामध्ये ३२ गावांमध्ये लावण्यात आलेल्या 'गाव विकणे आहे!' या आशयाच्या बॅनरने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. या बॅनरमुळे या ३२ गावांची जोरदार चर्चा होत आहे. या ३२ गावातील ग्रामस्थांनी गाव विकण्यास काढले आहे. या गावकऱ्यांनी गाव विकण्यास काढण्यामागचे कारण पुणे महानगर पालिका आहे. पुणे महानगर पालिकेचा जुलमी कर भरू शकत नसल्यामुळे ग्रामस्थांनी गाव विकण्यासाठी काढले आहे.

पुणे महापालिकेत समाविष्ट ३२ गावातील नागरिक आक्रमक झाले आहेत. पुणे महापालिकेचा जुलमी कर भरू शकत नसल्याने आमचे गावच महापालिकेने विकत घ्यावे अशी मागणी या ३२ गावातील ग्रामस्थांनी केली आहे. यासाठी ३२ गावांच्या माध्यमातून 'गाव विकणे आहे' अशा प्रकारच्या जाहिराती गावोगावी लावण्यात येऊन पुणे महापालिकेचा निषेध व्यक्त करण्यात आला आहे.

पुणे महानगर पालिकेने कोणत्याही प्रकारच्या सुविधा न पुरवता, टॅक्स मात्र भरमसाठ लावलेला आहे. त्यामुळे 'आम्ही टॅक्स भरू शकत नाही, तुम्ही आमचे गावच विकत घ्या' अशी भूमिका ३२ गावातील ग्रामस्थांनी घेतलेली आहे. टॅक्स या विषयावर ३२ गावातील नागरिक प्रचंड आक्रमक झाल्याचे चित्र सध्या पाहायला मिळत आहे. या ३२ गावच्या ग्रामस्थांनी मोठ्या आंदोलनाची तयारी दर्शवली आहे.

पुण्यातील धायरी, नऱ्हे, आंबेगाव किरकटवाडी, नांदोशी, खडकवासला नांदेड, उत्तमनगर, शिवणे, कोंढवे, कोपरे या गावांमध्ये सर्वच ठिकाणी गाव विकण्याबाबतचे बोर्ड लावण्यात आल्याचे दिसत आहे. पुणे महानगर पालिकेत समाविष्ट असणाऱ्या या ३२ गाव कृती समिती पालिकेविरोधात चांगलीच आक्रमक झाली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Company Fire: पगार कमी आल्यानं राग अनावर झाला; संतापलेल्या कर्मचाऱ्यानं कंपनीच जाळली

Weather Update : १३ राज्यांना वादळी वाऱ्यासह पाऊस झोडपून काढणार, गारपिटीची शक्यता; महाराष्ट्रात काय स्थिती?

Foods For Strong Hair: लांब आणि दाट केसांसाठी आहारात काय खावे?

Maharashtra News Live Update: भिवंडी शहरातील फातिमानगर येथील भंगाराच्या गोदामाला आग

Asha Bhosle Health Update: आशा भोसलेंची प्रकृती आता कशी आहे? डॉक्टरांनी दिली महत्वाची अपडेट

SCROLL FOR NEXT