Pune Rickshaw Strike Saam Tv
मुंबई/पुणे

Pune News : पुण्यात रिक्षा संघटनांकडून आज पुन्हा 'बंद'ची हाक; काय आहे कारण? वाचा...

पुणे आणि पिंपरी चिंचवड शहरातील रिक्षाचालक आजपासून पुन्हा संपावर जाणार आहे.

Dnyaneshwar Choutmal

पुणे : पुणे आणि पिंपरी चिंचवड शहरातील रिक्षाचालक आजपासून पुन्हा संपावर जाणार आहे. बेकायदा टॅक्सी विरोधात प्रशासनाने तोडगा न काढल्याने पुण्यातील रिक्षाचालक पुन्हा एकदा संपावर जाणार असल्याची माहिती आहे. त्यामुळे आज म्हणजेच सोमवारी पुण्यातील रिक्षा वाहतूक बंद राहणार आहे. पुण्यात एकूण 12 रिक्षाचालक संघटना आहेत. या रिक्षा चालकांनी बेकायदा टॅक्सी विरोधात आक्रमक भूमिका घेतली असून संप पुकारण्याची घोषणा केली आहे.  (Latest Marathi News)

पुण्यातील 'बघतोय रिक्षावाला' या संघटनेसह अनेक रिक्षा संघटना बंदमध्ये सहभागी होणार आहे. पुणे (Pune News) आणि पिंपरी चिंचवडमध्ये तब्बल एक लाखाहून अधिक रिक्षाचालक बंदमध्ये सहभागी होणार आहेत. 14 दिवसांचा अल्टिमेटम देऊनही प्रशासनाने मागण्या पूर्ण केल्या नाही. त्यामुळे प्रशासनाने फसवल्याचा आरोप करत रिक्षा चालक संघटना आंदोलनावर ठाम आहेत.

पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये बाईक टॅक्सी मोठ्या प्रमाणात सुरु आहेत. याचा फटका इतर रिक्षाचालकांना बसतो. त्यांना भाडं मिळणं कठीण होतं. याचा परिणाम त्यांच्या कमाईवर होतो. बाईक टॅक्सी बंद करण्याची मागणी त्यांनी यापूर्वीदेखील केली होती. काही प्रमाणात आंदोलनदेखील केलं होतं. मात्र त्यांची मागणी मान्य न झाल्याने त्यांनी आता आक्रमक भूमिका घेतली आहे. संपात एकूण 12 रिक्षाचालक संघटना सहभागी होणार आहेत.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी आदेश देऊनही अधिकाऱ्यांनी बेकायदा बाईक टॅक्सीवर कारवाई केली नाही, असा आरोप संघटनांनी केला आहेत. त्यामुळे आज सकाळी ११ वाजता पुण्यातील रिक्षाचालक आरटीओ कार्यालयाबाहेर चक्काजाम आंदोलन करणार आहे.

याआधी रिक्षाचालक संघटनांनी केलेल्या आंदोलनामुळे पुणेकरांचा मोठ्या प्रमाणात हाल झाले होते. तसेच खासगी वाहनचालकांनी प्रवाशांच्याकडून आणि विद्यार्थ्यांकडून अव्वाच्या सव्वा भाडे आकरले होते. त्यामुळे उद्या पुणेकरांना त्रास सहन करावा लागू शकतो.

Edited By - Satish Daud

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Liver disease: एड्सपेक्षाही धोकादायक आहे 'हा'लिव्हरचा आजार; 'साइलेंट किलर' समस्येची लक्षणंही वेळीच जाणून घ्या

Fraud Case : पैसे दुप्पट करण्याचे आमिष दाखवत ३०० कोटींची फसवणूक; शेकडो गुंतवणूकदार अडचणीत

Ankita Lokhande : नाकात नथ अन् कानात बुगडी; अंकिता लोखंडेचा मराठमोळा साज, पाहा PHOTO

Maharashtra Live News Update : विदर्भातील सात जिल्ह्यात आज जोरदार पावसाचा इशारा

Railway Recruitment: रेल्वेत सरकारी नोकरीची संधी; या पदांसाठी भरती सुरु; अर्ज कसा करावा?

SCROLL FOR NEXT