Nilesh Mazire with Wife Saam Tv
मुंबई/पुणे

Pune News : शिंदे गटातील नेत्याच्या पत्नीची आत्महत्या; राजकीय वर्तुळात खळबळ

Nilesh Mazire Wife News: कौटुंबिक वादातून आत्महत्या केल्याचा प्राथमिक अंदाज

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

सचिन जाधव

Pune Crime News : शिंदे गटातील निलेश माझिरे(Nilesh Mazire) यांच्या पत्नीने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. बुधवारी विष प्राशन केल्यानंतर गुरुवारी रात्री त्यांचा रुग्णालयात मृत्यू झाला. कौटुंबिक वादातून आत्महत्या केल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात येत आहे.

पुण्यात (Pune) राहत्या घरी विष प्राशन करून त्यांनी आत्महत्या केल्याचं उघड झालं आहे. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे.माझिरे हे माथाडी कामगार सेनेचे जिल्हाध्यक्ष आहेत. काही दिवसांपूर्वी त्यांची मनसेमधून हकालपट्टी करण्यात आली होती त्यानंतर त्यांनी बाळासाहेबांची शिवसेनामध्ये प्रवेश केला होता.

माझिरे हे मनसे नेते वसंत मोरे यांचे कट्टर समर्थ होते. या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केल्याची माहिती समोर आली आहे. या प्रकरणाचा अधिक तपास पोलिसांकडून करण्यात येत आहे. दरम्यान, कौटुंबिक वादातून माझिरे यांच्या पत्नीने आत्महत्या केली असली तरी हा वाद नेमका काय होता हे अजून कळलेलं नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Manoj Jarange Patil: मनोज जरांगेंचे सहकारी चौकशीच्या फेऱ्यात; वाळू तक्सरीत संजय कटारेंना 5 कोटींचा दंड

FDAचा कारवाईचा धडाका सुरूच; मुंबईतील 100 वर्षाहून जुन्या बेकरीचा FSSAI परवाना निलंबित

Cylinder Blast : जेवण बनवताना गॅस सिलिंडरचा स्फोट, ३ घरं कोसळली, लहान मुलासह चौघांचा मृत्यू

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचा परीक्षेसंदर्भात मोठा निर्णय; मुख्य परीक्षेची तारीख बदलली

Maharashtra News Live Update: वादळी वाऱ्यामुळे आलेल्या पावसाने गणपती मंडळाची लोखंडी कमान भररस्त्यात कोसळली

SCROLL FOR NEXT