Sharad Pawar-Dilip Walse Patil Saam Tv
मुंबई/पुणे

Maharashtra Politics: दिलीप वळसे पाटील भाषण देत असतानाच 'शरद पवार जिंदाबाद'च्या घोषणा; पुढे काय घडलं? VIDEO

Dilip Walse Patil News: शिरुर तालुक्यातील पाबळ येथे बैलगाडा शर्यतीच्या कार्यक्रमानिमित्त सहकारमंत्री दिलीप वळसे पाटील (Dilip Walse Patil) आले होते. यावेळी शरद पवारांच्या नावाने घोषणा झाल्याचा व्हिडिओ सध्या माध्यमांवर व्हायरल होत आहे.

रोहिदास गाडगे

Maharashtra Politics:

कधीकाळचे शरद पवार यांचे राजकीय शिष्य म्हणून ओळखले जाणारे दिलीप वळसे पाटील हे अजित पवारांसोबत गेले आहेत. दिलीप वळसे पाटील यांच्या बंडानंतर शरद पवार यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. काही दिवसांपूर्वीच शरद पवारांनी त्यांच्या होमपिचवर सभा घेत दिलीप वळसेपाटलांकडे पाच टक्केही निष्ठा शिल्लक नसल्याची टिका केली होती. आता या सभेनंतर दिलीप वळसे पाटील यांच्या कार्यक्रमात शरद पवारांच्या नावाने घोषणा झाल्याचा व्हिडिओ सध्या माध्यमांवर व्हायरल होत आहे.

शिरुर तालुक्यातील पाबळ येथे बैलगाडा शर्यतीच्या कार्यक्रमानिमित्त सहकारमंत्री दिलीप वळसे पाटील (Dilip Walse Patil) आले होते. यावेळी दिलीप वळसे पाटील हे आपल्या भाषणात पाणी प्रश्न मार्गी लावण्याचे आश्वासन देत होते. याचवेळी काही कार्यकर्त्यांकडून शरद पवार जिंदाबादच्या घोषणा दिल्या.

या घोषणांमुळे दिलीप वळसे पाटील यांना आपले भाषण थांबवावे लागले आहे. तसेच अरे बाबा! तुमच्या ऐवढच माझंही प्रेम शरद पवारांवर (Sharad Pawar) आहे. मीही ४० वर्ष शरद पवारांसोबत राहिलोय पण काही राजकिय प्रश्न असतात. त्याबाबत सभेतून खुलासा करु.. राजकीय कार्यक्रमात राजकीय बोलू, आत्ता कामांवर बोलू.. असे दिलीप वळसे पाटील म्हणाले.

 ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

जाहीर सभेतून केली होती टीका..

दरम्यान, काही दिवसांपूर्वीच शरद पवार यांनी दिलीप वळसे पाटील यांच्या मतदार संघात सभा घेत त्यांच्यावर जोरदार निशाणा साधला आहे. वळसे पाटील यांना अनेक मंत्रिपदे दिले. विधानसभेचे अध्यक्षपद दिले. देशाच्या साखर उद्योगांचे सबंध हिंदुस्तानचे पद दिले. अशा अनेक गोष्टी दिल्या. प्रतिष्ठा दिली आणि हे दिल्यानंतर सुद्धा दत्तू पाटलांमध्ये जी निष्ठा होती, त्या निष्ठेची ५% सुद्धा त्यांच्यात नाही, अशी टीका जरांगेंनी केली होती. (Latest Marathi News)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Face Care: आठवड्यातून किती वेळा फेस स्क्रब केलं पाहिजे?

Maharashtra Live News Update: विठ्ठल रुक्मिणी मंदिर फुलांनी सजले

Marathi bhasha Vijay Live Updates : लाडक्या बहिणीचं पोर्टल बंद, आता नव्याने नोंदणी होणार नाही - ठाकरे

Raj-Uddhav Thackeray Photo: राज ठाकरे-उद्धव ठाकरे एकत्र, मराठी माणसाला जे हवं तेच झालं, पाहा PHOTO

Marathi Bhasha Mumbai Worli Dome: जे बाळासाहेबांना जमलं नाही, ते फडणवीसांना जमलं - राज ठाकरेंचा टोला | VIDEO

SCROLL FOR NEXT