security guard brutally beaten by hawkers Saam Tv
मुंबई/पुणे

Pune News: पुण्यात फेरीवाल्यांची मुजोरी, अतिक्रमण कारवाईदरम्यान सुरक्षारक्षकाला बेदम मारहाण, Video व्हायरल

Latest News: पुण्याच्या कोरेगाव पार्क (Koregaon Park) परिसरात ही घटना घडली.

Priya More

Pune Latest News: पुण्यात (Pune) अतिक्रमण हटविण्यासाठी गेलेल्या महानगरपालिकेच्या (Pune Corporation) सुरक्षारक्षकाला मारहाण केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. काही तरुणांनी या सुरक्षारक्षकाला लाथा-बुक्यांनी बेदम मारहाण केली आहे. पुण्याच्या कोरेगाव पार्क (Koregaon Park) परिसरात ही घटना घडली. या घटनेमुळे घटनास्थळावर गोंधळाचे वातावरण आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, पुणे शहरामध्ये अतिक्रमणाविरोधात कारवाई सुरु आहे. या कारवाईदरम्यान पुणे महापालिका अतिक्रमण विभागाच्या सुरक्षारक्षकाला मारहाण झाली आहे. कोरेगाव पार्क येथील ढोले पाटील क्षेत्रीय कार्यालय परिसरात हा धक्कादायक प्रकार घडला आहे. रस्त्यावरील अनधिकृत फेरीवाले यांच्याविरुद्ध कारवाई सुरू असताना सुरक्षारक्षकाला ही मारहाण करण्यात आली आहे. या घटनेचा व्हिडिओ देखील समोर आला आहे.

पुण्यातील क्षेत्रीय कार्यालयाच्या अंतर्गत अतिक्रमण विभागने आज सकाळपासून कारवाईला सुरुवात केली आहे. पुण्यामध्ये अतिक्रमण विरोधी कारवाई सुरु असताना पालिकेच्या सुरक्षारक्षकावर काही तरुणांनी हल्ला केला.

फेरीवाल्यांनी एकत्र येत पालिकेच्या सुरक्षारक्षकाला बेदम मारहाण केली. अनाधिकृत फेरीवाल्यांविरोधात कारवाई केली जात असताना त्यांनी सुरक्षा कर्मचाऱ्यावर हात उचलला. ही घटना अनेकांनी आपल्या मोबाईलच्या कॅमेऱ्यात कैद केली आहे. हा व्हिडिओ आता सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

या व्हिडीओमध्ये काही तरुण सुरक्षा कर्मचाऱ्यावर हल्ला करताना दिसून आहेत. यावेळी दोघा-तिघांनी या सुरक्षारक्षकाला पकडून लाथा- बुक्क्याने मारत होते. तसेच एकाने तर हातातील बकेट देखील कर्मचाऱ्याच्या डोक्यात घातली. तसेच एक तरुण मात्र हे भांडण थांबवण्याचा प्रयत्न करत होता. तो सुरक्षा कर्मचाऱ्याला लांब नेण्याचा प्रयत्न करत असताना काही तरुण पुन्हा त्याच्या अंगावर जाण्याचा प्रयत्न करत होते. याप्रकरणी आता अतिक्रमण विभाग काय कारवाई करतो हे पाहवे लागणार आहे

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

घरबसल्या ५ मिनिटांत ट्रान्सफर करा जुन्या कंपनीचा PF; चक्रवाढ व्याजाचा फायदा मिळवण्यासाठी फॉलो करा 'ही' एक ट्रिक

8th Pay Commission: केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! 8व्या वेतन आयोगाबाबत लवकरच मोठा निर्णय होणार, किती असेल फिटमेंट फॅक्टर? वाचा...

Maharashtra News Live Update : मंत्री छगन भुजबळ यांच्या संपर्क कार्यालयासमोर पोलिसांचा बंदोबस्त वाढवला

Health checkups after 40: वयाच्या 40 नंतर शरीरात सुरू होतात हे बदल, डॉक्टरांनी सांगितल्या या 4 टेस्ट करून घ्याच!

Gold Rate Today : गुड न्यूज! सोन्याच्या दरात मोठी घसरण, सोनं ४००० रुपयांनी स्वस्त, वाचा आजचे 18K- 22K आणि 24K चे दर

SCROLL FOR NEXT