Shatabdi express file photo
Shatabdi express file photo  Saam Tv
मुंबई/पुणे

Pune News : रेल्वे प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर; धावत्या शताब्दी एक्सप्रेसवर दरोड्याचा प्रयत्न

साम टिव्ही ब्युरो

Pune Crime News : सिकंदराबाद-पुणे या धावत्या शताब्दी एक्सप्रेसवर दरोड्याचा प्रयत्न झाल्याची घटना घडली आहे. शताब्दी एक्सप्रेसवर दगडफेक करत दरोड्याचा प्रयत्न केला आहे. या दगडफेकीत एका प्रवासी डब्ब्याची खिडकी फुटली. मात्र, सुदैवाने कोणत्याही प्रवाशाला इजा झाली नाही. (Latest Marathi News)

चार दिवसांपूर्वी थांबलेल्या काकीनाडा एक्सप्रेसवर दरोडेखोरांनी दरोडा टाकला. त्यानंतर दगडफेक झाल्याची घटना घडली आहे. सोलापूर - दौंड - पुणे लोहमार्गावर १८ डिसेंबर रोजी रात्री भिगवण (ता. इंदापूर) व बोरीबेल (ता. दौंड) रेल्वे स्थानकाच्या दरम्यान शताब्दी एक्सप्रेसवर (क्रमांका १२०२६) ही दगडफेक करण्यात आली.

दगडफेकीमुळे सी - ३ या डब्ब्यातील खिडकी क्रमांक ५८ ची बाहेरील काच फुटली. या दगडफेकीत खिडकीच्या काचेला तडा गेला. या खिडकीजवळ महिला प्रवासी चंद्रकला यांचे आरक्षण होते. परंतु सुदैवाने त्यांना कसलीही इजा झाली नाही.

पुणे (Pune) रेल्वे स्थानकावर झालेल्या या घटनेची दखल दौंड रेल्वे सुरक्षा दलाच्या पोलिसांनी केली आहे. या घटनेबाबत तक्रार दाखल झाल्यानंतर हा गुन्हा दौंड रेल्वे सुरक्षा दलाने पोलीस ठाण्याकडे तपासासाठी वर्ग करण्यात आला आहे. या प्रकरणी अज्ञाताविरूध्द रेल्वे कायदा कलम १५४ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास रेल्वे सुरक्षा दलाच्या पोलिसांनी सुरू केली आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Avinash Jadhav: मनसे नेते अविनाश जाधव यांच्यावर खंडणीचा गुन्हा; सराफा व्यापाऱ्याकडे ५ कोटी मागितल्याचा आरोप

Health Tips: सकाळी प्या हिंगाचे पाणी, वजन राहील नियंत्रणात

Maharashatra Election: ठाण्यात शिंदे सेनेचं टेन्शन वाढलं? ठाण्याचा किल्ला राखणं शिंदेंना जड?

West Bengal News: पश्चिम बंगालच्या राज्यपालांवर लैंगिक छळाचा आरोप; कर्नाटकचे खासदार प्रज्ज्वल रेवन्नाविरोधात लुकआउट नोटीस जारी

Jayant Patil: ... तर पंचाईत होईल, जयंत पाटील यांचा विश्वजित कदम यांना इशारा; नेमकं काय म्हणाले?

SCROLL FOR NEXT