Pune Omkareshwar Temple Saam Tv
मुंबई/पुणे

Pune News: पुण्यात पेशवेकालीन ओंकारेश्वर मंदिरात चोरी, चोरट्यांनी दानपेटी फोडली

Pune Omkareshwar Temple: ओंकारेश्वर मंदिरात शनिवारी चोरट्याने गाभाऱ्यातील दानपेटीचे कुलूप तोडून ६ हजार रुपये चोरून नेले. यामुळे खळबळ उडाली आहे.

Priya More

पुण्यातील प्रसिद्ध पेशवेकालीन ओंकारेश्वर मंदिरात चोरी झाल्याची घटना उघडकीस आली आहे. शनिवार पेठेतील ओकांरेश्वर मंदिरामधील दानपेटी चोरट्यांनी फोडली. चोरट्यांनी दानपेटीतील ६ हजार रुपयांची रोकड लंपास केली. विश्रामबाग पोलिस याप्रकरणाचा तपास करत आहेत. या घटनेमुळे पुण्यात खळबळ उडाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, ओंकारेश्वर मंदिरात शनिवारी चोरट्याने गाभाऱ्यातील दानपेटीचे कुलूप तोडून ६ हजार रुपये चोरून नेले. हा प्रकार उघडकीस आल्यानंतर कौस्तुभ गाडे यांनी विश्रामबाग पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. या तक्रारीनंतर विश्रामबाग पोलिस ठाण्यात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी मंदिराच्या आवारातील सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घेतले असून पुढील तपास सुरू आहे.

दरम्यान, नाशिकच्या शिवाजीनगर येथील कुबेर भंडारे महादेव मंदिराच्या दानपेटीवर चोरट्याने डल्ला मारल्याची बातमी सोमवारी घडली होती. सोमवारी पहाटे तीन वाजेच्या सुमारास ही घटना घडली. मंदिरातले सहा हजार रुपयांपेक्षा जास्त दान या चोरट्यांनी लंपास केले. चोरीची घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाल्यामुळे उघडकीस आली.

गंगापूर पोलिस ठाण्यामध्ये या चोरीप्रकरणी चोरट्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. शहरात अनेक मंदिरात अशाच पद्धतीच्या चोरांच्या घटना वाढल्या आहेत. याआधी देखील सातपूर परिसरामध्ये एका मंदिरात चोरट्याने दानपेटीवर जायला मारला होता. या चोरीच्या घटनांवर लवकरात लवकर आळा घालावा आणि चोरट्यांना पोलिसांनी लवकर पकडावे अशी मागणी नागरिकांनी केली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Amravati Teachers Constituency: अमरावती शिक्षक मतदारसंघात शिवसेना ठाकरे गट काँग्रेस आमने-सामने; दोन्ही पक्षांनी उमेदवार जाहीर केल्याने वाढली रंगत

Maharashtra News Live Update: दादर-शिवाजी पार्क परिसरात CJP आंदोलकांवर पोलिसांची कारवाई

Crab Fact : खेकड्याच्या रक्ताचा रंग कोणता? ९९% लोकांना माहितीच नाही खरं कारण, जाणून घ्या

Navratri Colours 2026: देवीची 9 रूपं आणि 9 शुभ रंग, यंदा नवरात्रीला कोणत्या दिवशी कोणता रंग घालायचा?

Wheat flour shelf life: गव्हाचं पीठ किती दिवसात खराब होतं?

SCROLL FOR NEXT