Fire breaks out in container In Pune  Saam Tv
मुंबई/पुणे

Pune News: पुण्यात कंटेनरला लागली भीषण आग, ४ जणांचा होरपळून मृत्यू

Fire Breaks Out In Container In Pune : पुण्यात कंटेनरला लागली भीषण आग, ४ जणांचा होरपळून मृत्यू

साम टिव्ही ब्युरो

>> अक्षय बडवे

Fire Breaks Out In Container In Pune :

पुण्यात एक मोठी दुर्घटना घडल्याची बातमी समोर येत आहे. येथील स्वामी नारायण मंदिराजवळ कंटेनरला भीषण आग लागली आहे. घटनास्थळी अग्निशमन दलाच्या चार गाड्या दाखल झाल्या असून आग विझवण्यात आली आहे.

या दुर्घटनेत चार जणांचा होरपळून मुत्यू झाला आहे. हे चारही जण एकाच कुटुंबातील असल्याची शक्यता वर्तवली जात आहे, असं असलं तरी अद्याप त्यांची ओळख पटलेली नाही.

मिळालेल्या माहितीनुसार, रस्त्यावर उभा असलेल्या या कंटेनरला सातारच्या दिशेने आलेला ट्रकने धडक दिली. यानंतर ट्रकने पेट घेतला, अशी प्राथमिक माहिती आहे.

आगीची माहिती मिळताच येथे अग्निशमन दलाच्या चार गाड्या दाखल झाल्या. त्यांनी आग विझवली आणि चार लोकांचे मृतदेह बाहेर काढले. या चौघांचा होरपळून मृत्यू झाला. (Latest Marathi News)

दरम्यान, कंटेनरला आग लागल्यानंतर या मार्गावर काही काळ वाहतूक विस्कळीत झाली होती. मात्र आता वाहतूक सुरळीत करण्यात येत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: नांदेडमध्ये पीक कर्ज देण्यास एसबीआय बँक आणि महाराष्ट्र ग्रामीण बँकेची टाळाटाळ

Night Walking : रात्रीच्या जेवणानंतर १० मिनिटे चालल्यास काय होते? ७ जबरदस्त फायदे वाचून तुम्हीही आजपासूनच कराल सुरुवात

Blast: केमिकलच्या कंपनीत भीषण स्फोट, ५ कामगारांचा होरपळून मृत्यू

Political News : भाजपच्या १६ नगरसेवकांविरोधात गुन्हा, पत्रकार आणि नागरिकांना मारहाण केल्याचा आरोप

Naukasana Benefits: वाढलेलं वजन कमी करायचंय? फिट शरीरासाठी घरच्या घरी सकाळी करा 'हा' सोपा योगा

SCROLL FOR NEXT