Pune News Saam Tv
मुंबई/पुणे

Pune : पीएमपी चालकाला मारहाण; पुणे स्टेशन परिसरातील घटना

व्हिडिओ व्हायरल झाल्याने एकच खळबळ उडाली आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

सचिन जाधव

Pune News : पुण्यात पीएमपीएमएलच्या बसचालकाला दुचाकी चालकाने बेदम मारहाण केल्याची घटना घडली आहे. पुणे (Pune) स्टेशन परिसरात ही घटना घडली आहे.रस्त्यावरून जाताना दुचाकीचालक तरुण आणि पीएमपी (PMP) चालक-वाहकांत जोरदार हाणामारी झाल्याचा व्हिडिओ व्हायरल (Video Viral) झाल्याने एकच खळबळ उडाली आहे.

तरुणांनी चालकाला चक्क चपलेने मारल्याचे व्हिडिओत दिसत आहे. सलग तिसर्‍या दिवशी असा प्रकार घडला आहे. याप्रकरणी दोघांनी एकमेकांविरोधात पोलिसांत तक्रारी केल्या आहेत.रविवारी स्वारगेट डेपोची बस सुसाट वेगाने पुणे स्टेशन परिसरात आली. तेथे दुचाकीवरून तरुण जात होते. ते बससमोर आडवे आले. त्यामुळे चालकाने त्यांना हटकले. दोघांनीही एकमेकांच्या चुका सांगत बाचाबाची केली. तरुणांनी थेट चालकाची कॉलर पकडून चपलांनी हाणामारी सुरू केली.

अधिक माहितीनुसार, पुणे स्टेशन परिसरात एका पीएमपी चालक आणि दुचाकी चालकामध्ये वाद झाला. पीएमपी चालकाने दुचाकीला ओव्हरटेक केल्यावरून हा वाद झाल्याची माहिती असून त्यानंतर या वादाचे रूपांतर हाणामारीत झाले. यावेळी चालक, कंडक्टर आणि दुचाकीवरील व्यक्ती यांच्यामध्ये हाणामारी झाली. रविवारी ही घटना घडली असून या प्रकरणी बंडगार्डन पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल करण्यात आली आहे. या घटनेचा व्हिडिओ सध्या व्हायरल झाला आहे.

Edited By - Shivani Tichkule

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: मुंबईसह पालघर जिल्ह्याला आज रेड अलर्ट

Breast Cancer Symptoms: स्तनामध्ये दिसणारी गाठ म्हणजेच कर्करोग नाही; त्वचेवर दिसणारी ब्रेस्ट कॅन्सरची ही ५ लक्षणं वेळीच ओळखा

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची अचानक प्रकृती बिघडली, ठाण्यातील रुग्णालयात दाखल, सर्व कार्यक्रम रद्द

Panvel Fort : पनवेलपासून हाकेच्या अंतरावर वसलाय 'हा' किल्ला, इतिहासप्रेमींनी वीकेंडला करा भटकंती

Actor Video : मुसळधार पावसात प्रसिद्ध अभिनेत्याच्या कारवर झाड कोसळले, थोडक्यात जीव वाचला

SCROLL FOR NEXT