Pune Shaniwarpeth News Saam tv
मुंबई/पुणे

Pune News: इमारतीच्या सहाव्या मजल्यावरून पडून वृद्ध महिलेचा मृत्यू; शनिवार पेठेतील दुर्देवी घटना

Pune News Today: ही दुर्देवी घटना शनिवार पेठ परिसरात शुक्रवारी सकाळच्या सुमारास घडली.

साम टिव्ही ब्युरो

अक्षय बडवे, साम टीव्ही

Pune Shaniwarpeth News: पुणे शहरातून एक भयानक घटना समोर आली आहे. इमारतीच्या ६ व्या मजल्यावरून पडून एका वृध्द महिलेचा जागीच मृत्यू झाला आहे. ही दुर्देवी घटना शनिवार पेठ परिसरात शुक्रवारी सकाळच्या सुमारास घडली. विजया दुदाठे (वय ७६) असे मृत्युमुखी पडलेल्या वृध्द महिलेचे नाव आहे.

या घटनेनं परिसरातून हळहळ व्यक्त होत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, विजया दुदाठे या शनिवार पेठेतील एका इमारतीत त्यांच्या कुटुंबियांसोबत राहत होत्या. काही महिन्यांपासून त्यांना सातत्याने भोवळ येत होती. याशिवाय विजया आजारी सुद्धा होत्या.

दरम्यान, आज सकाळी नेहमीप्रमाणे विजया इमारतीवर सहाव्या मजल्यावर असलेल्या मंदिराचे दर्शन घेण्यासाठी गेल्या. खाली उतरत असताना त्यांना अचानक चक्कर आली आणि त्या गॅलरीतून थेट खाली कोसळल्या. या घटनेत विजया यांच्या डोक्याला गंभीर इजा झाल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला.

Edited by - Satish Daud

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ashok Kharat: तू दिसायला सुंदर तरी..., अशोक खरात महिलांचं माइंड रिडिंग कसा करायचा? हादरवणारी माहिती आली समोर

Poha Papad Recipe : किलोभर पोह्याचे करा डबाभर पापड; 'ही' आहे सोपी रेसिपी, वर्षभर राहतील कुरकुरीत

Sabja Water Benefits: उन्हाळ्यात सब्जाचे पाणी प्यायल्याने मिळतील 'हे' आरोग्यदायी फायदे

Bigg Boss Marathi 6 : डॉनची घरातून Exit; टॉप १० मध्ये येऊन सुद्धा शेवटच्या क्षणी ट्रॉफी हुकली, प्रभू झाला भावुक | VIDEO

Rain Alert : पुढचे ५ दिवस राज्यासाठी महत्वाचे, विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता; 'या' जिल्ह्यांना यलो अलर्ट

SCROLL FOR NEXT