Pune Crime News Saam TV
मुंबई/पुणे

Pune Crime News : DJच्या आवाजाची तक्रार करणाऱ्या वृद्धाला शेजाऱ्यांकडून मारहाण, अपमान सहन न झाल्याने जीवनच संपवलं

Pune Crime News : ज्ञानेश्वर साळुंखे असं 70 वर्षीय पीडित व्यक्तीचे नाव आहे.

साम टिव्ही ब्युरो

अक्षय बडवे

Pune News : शेजाऱ्यांकडून झालेली मारहाण आणि अपमानाला कंटाळून एका वृद्ध व्यक्तीने आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. पुण्यातील येरवडा भागातील धक्कादायक घटना घडली आहे. याप्रकरणी पोलिसांनी पाच जणांना अटक केली आहे.

ज्ञानेश्वर साळुंखे असं 70 वर्षीय पीडित व्यक्तीचे नाव आहे. याबाबत मुलगा पांडुरंग ज्ञानेश्वर साळुंखे यांनी येरवडा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यावरुन पोलिसांनी चेतन बेले, देवेश ऊर्फ नन्या पवार, यश मोहिते, शाहरुख खान, जय तानाजी भडकुंभे या 5 जणांना अटक केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, चेतन बेले हा फिर्यादी साळुंखे यांच्या घराशेजारी राहायला आहे. नवी खडकी परिसरात 28 मे रोजी आरोपीच्या घरात हळदीचा कार्यक्रम सुरू असल्याने डीजे स्पीकर लावला होता. स्पीकरच्या आवाजाचा त्रास होत असल्याने ज्ञानेश्वर साळुंखे यांनी त्या ठिकाणी जाऊन आवाज कमी करा, आम्हाला त्रास होतो असे सांगितले. यावरून आरोपींनी त्यांचा अपमान केला आणि त्यांना हाकलून दिलं.

मात्र त्रास होत असल्याने साळुंखे त्याठिकाणी पुन्हा गेले आणि आवाज कमी करण्याची विनंती केली. मात्र यावेळी त्यांना मारहाण करण्यात आली. चेतन बेले याने फिर्यादीच्या डोक्यात कोयता मारुन जखमी केले. (Latest News Update)

याप्रकरणी फिर्यादी हे येरवडा पोलीस ठाण्यात तक्रार देण्यासाठी गेले. त्या गोष्टीचा राग मनात धरुन आरोपी यांनी पुन्हा फिर्यादीचे वडील ज्ञानेश्वर साळुंखे यांना मारहाण केली. मारहाणीमुळे होणार्‍या वेदना व अपमान सहन न झाल्याने त्यांनी बंडगार्डन पुलावरुन नदीमध्ये उडी मारुन आत्महत्या केली. या प्रकरणी पोलिसांना पाच जणांना अटक केली असून अधिक तपास सुरु आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

TMC Spilt : ममता बॅनर्जींचे २० खासदार 'नॉट रीचेबल'; भाजप मुख्यमंत्र्यांसोबत दिल्लीत गुप्त बैठक, महाराष्ट्रासारखा पक्ष फुटणार?

Empty Stomach Fruits: रिकाम्या पोटी ही फळं चुकूनही खाऊ नयेत

Hair Care: केसगळती, कोंडा आणि ड्रेयनेसला म्हणा बाय-बाय! फक्त या सवयींनी मिळतील हेल्दी केस

Maharashtra News Live Update: पुण्यातील अनधिकृत हाऊस पार्टी प्रकरणातील सर्व तरुणांच्या पालकांना पोलीस पाठवणार नोटीस

Silver Price Today: सोन्यानंतर चांदीच्या किंमतीतही मोठी घसरण, वाचा ताजे दर

SCROLL FOR NEXT