Dahi Handi Controversy Saam Tv
मुंबई/पुणे

Pune News: दहीहंडीत अश्लील नृत्य, पुण्यात डान्सर निशा मुंबईकर अन् शुभांगी थोरातसह ८ जणींवर गुन्हा

Dahi Handi Controversy: पुण्यामध्ये दहीहंडी कार्यक्रमात अश्लील डान्स केल्याप्रकरणी डान्सरविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. राधा पाटीलनंतर निशा मुंबईकर आणि शुभांगी थोरात यांच्यासह ८ जणींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.

Priya More
  • पुण्यात दहीहंडीमध्ये अश्लील नृत्य केल्याप्रकरणी डान्सरविरोधात मोठी कारवाई

  • निशा मुंबईकर आणि शुभांगी थोरात यांच्यासह ८ जणींवर गुन्हा दाखल

  • दहीहंडी कार्यक्रमातील नृत्यांगनांवर पुणे पोलिसांची कारवाई

  • सहकारनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला

अक्षय बडवे, पुणे

पुण्यात दहीहंडीच्या कार्यक्रमात अश्लील गाण्यावर नृत्य करणाऱ्या नृत्यांगनांवर पोलिसांनी कारवाईचा बडगा उगारला आहे. प्रसिद्ध नृत्यांगना राधा पाटीलवर गुन्हा दाखल केल्यानंतर आता आणखी ८ नृत्यांगनांविरोधात पुणे पोलिसांनी कारवाई केली आहे. पुण्यातील सहकारनगर पोलिस ठाण्यात या ८ जणींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यामध्ये प्रसिद्ध नृत्यांगना निशा मुंबईकर आणि शुभांगी थोरात यांच्यासह ८ जणींचा समावेश आहे. विशेष म्हणजे केवळ नृत्यांगनाच नाही, तर कार्यक्रमाचे आयोजक आणि मंडळाच्या पदाधिकाऱ्यांवरही पोलिसांनी कारवाई केली आहे.

दहीहंडीचा उत्साह, मोठी गर्दी, आणि त्यात रंगलेला नृत्याचा कार्यक्रम मात्र याच कार्यक्रमात अश्लील गाणी वाजवून त्यावर अश्लील हावभाव करत नृत्य केल्याचा आरोप आता संबंधित नृत्यांगनांना चांगलाच महागात पडला आहे. पुण्यातील सहकारनगर पोलिस ठाण्यात याप्रकरणी आणखी ८ नृत्यांगनांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यामध्ये प्रसिद्ध नृत्यांगना निशा मुंबईकर आणि शुभांगी थोरात यांच्यासह ८ जणींचा समावेश आहे. गुन्हा दाखल झाल्यामुळे या सर्व नृतांगनांचे टेन्शन वाढलं आहे.

दहीहंडीच्या कार्यक्रमादरम्यान अश्लील गाणी वाजवून त्यावर नृत्य करण्यात आल्याचा आरोप या सर्व नृत्यांगनांवर आहे. या कार्यक्रमासाठी आवश्यक परवानग्या आणि संबंधित नियमांचे पालन करण्यात आले होते का? याबाबतही पोलिसांकडून तपास करण्यात येत आहे. महाराष्ट्रातील कला, लोककला, चित्रपट आणि सांस्कृतिक कार्यक्रमांशी संबंधित रंगभूमी प्रयोग परिनिरीक्षण मंडळाच्या नियमांनुसार आवश्यक प्रमाणपत्र घेणे गरजेचे असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले आहे. तसंच पुणे शहर पोलिसांकडूनही नृत्याच्या कार्यक्रमासाठी आवश्यक परवानगी घेणे अपेक्षित असल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे.

या प्रकरणात पोलिसांनी केवळ नृत्यांगनांवरच कारवाई केलेली नाही तर अष्टविनायक मित्र मंडळाचे अध्यक्ष आणि उपाध्यक्ष, तसेच रिस्की बॉईज ग्रुपचे अध्यक्ष आणि उपाध्यक्ष यांच्याविरोधातही सहकारनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. म्हणजेच कार्यक्रमात अश्लील नृत्य सादर झाल्याप्रकरणी कलाकारांसोबतच आयोजकांनाही पोलिसांच्या कारवाईला सामोरं जावं लागलं आहे. महत्वाचे म्हणजे ठाण्यामध्ये भाजप नगरसेविकेने नृतांगना गौतमी पाटीलविरोधात तक्रार दाखल केली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: जरांगे पाटील यांनी आंदोलन स्थगित करावं- प्रसाद लाड

मुख्यमंत्र्यांच्या नावाने बनावट सोशल अकाऊंट, होमगार्डला अटक; जळगाव कनेक्शन आले समोर

Heart Attack : बाहेरून फिट दिसत असलात तरी सावध! हार्ट अटॅकचा धोका वाढवू शकतात या ४ गोष्टी

Bribe Case : पुण्यात API ला २,५०,००० रुपयांची लाच घेताना रंगेहाथ पकडलं, असा सापडला जाळ्यात

Smoking health risks: सिगारेट पिणाऱ्यांच्या आजूबाजूलाही फिरकू नका; वाढतो मृत्यूचा धोका

SCROLL FOR NEXT