Pune City News saam tv
मुंबई/पुणे

Pune News : पुण्यात हिट अँड रनचा थरार! मॉर्निंग वॉकला घराबाहेर पडला, तो परतलाच नाही.. CCTV कॅमेऱ्यात कैद झाला शेवटचा फोटो

Pune City News : पुण्यात मॉर्निंग वॉकसाठी निघालेल्या तरुणाला चारचाकी कारने धडक दिली. या धडकेमध्ये तरुणाचा जागीच मृत्यू झाला. अपघाताचे काही धक्कादायक फोटो समोर आले आहेत. ही घटना कशी घडली याचा पोलीस तपास करत आहेत.

Yash Shirke

सागर आव्हाड, साम टीव्ही, प्रतिनिधी

पुणे : मॉर्निंग वॉकसाठी घराबाहेर पडलेल्या एका तरुणाचा दुर्दैवी अपघातामध्ये मृत्यू झाला आहे. या अपघाताचे काही धक्कादायक फोटो देखील समोर आले आहेत. घटनास्थळी कोणतेही सामान न सापडल्याने मृत तरुणाची अद्याप ओळख पटलेली नाही. हा अपघात कसा झाला याचा शोध पोलीस घेत आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, पुण्यातील उंड्री येथील न्याटी एस्टेबन सोसायटीजवळ आज (१ एप्रिल रोजी) एका अपघातामध्ये मॉर्निंग वॉक करणाऱ्या तरुणाचा मृत्यू झाला. हा अपघात कसा झाला याची माहिती अद्याप मिळालेली नाही. पण प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, सकाळी मोकळ्या हवेत वॉकसाठी घराबाहेर पडलेल्या या तरुणाला चारचाकी कारने धडक दिली.

चारचाकी कारने दिलेल्या धडकेमध्ये मॉर्निंग वॉकसाठी घराबाहेर पडलेल्या तरुणाचा मृत्यू झाल्याची माहिती प्रत्यक्षदर्शींनी दिली आहे. हा तरुण कोण? तो कुठे राहतो? त्याचा अपघात कसा झाला? याचा शोध पोलीस घेत आहेत. दरम्यान हा तरुण उंड्री येथील न्याटी एस्टेबन सोसायटीजवळ धावताना सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झाला होता.

मोकळ्या हवेमध्ये वॉक करण्यासाठी अनेकजण सकाळी घराबाहेर पडत असतात. पण अशा अपघाताच्या घटना घडत असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. भरधाव वाहने वॉकिंग करणाऱ्या नागरिकांना धडकून जात असल्याच्या घटना पुण्यात दिवसेंदिवस वाढत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Bhaata Marathi Movie: गरिबी, संघर्ष आणि मुलीचं स्वप्न; 'भाटा'मधून उलघडणार एका बापाची प्रेरणादायी गोष्ट

Maharashtra News Live Update: जळगावात भीषण अपघात; टँकरच्या धडकेत भाजी विक्रेत्या महिलेचा मृत्यू, मुलगा जखमी

Maharashtra Politics : फडणवीस-शिंदे असते तर गुंगा गुड्डा म्हटले असते, राऊतांच्या वक्तव्याने वाद उफळणार?

Morning Exercise: सकाळी उठताच फक्त ५ मिनिटे करा 'हे' व्यायाम; दिवसभर राहाल उत्साही आणि फ्रेश

Eknath Shinde : सिद्धिविनायक मंदिर देणगी घोटाळा प्रकरणात एकनाथ शिंदेंचे तातडीचे आदेश, ठाकरे सेना अडचणीत येणार?

SCROLL FOR NEXT