Raj Thackeray Saam Tv
मुंबई/पुणे

Raj Thackeray News: 'ऐवढी आंदोलनं केली, पण पदरी काय पडलं?'; खड्डे आणि ट्राफिकच्या मुद्द्यावरुन राज ठाकरे पुन्हा आक्रमक

Raj Thackeray Press Conference: खड्ड्यांविरोधात जनता एकत्र येत नाही आणि जनतेचा राग जोपर्यंत मत पेट्यांमधून दिसत नाही. तोपर्यंत रस्त्यांवरील खड्डे बुजणार नाहीत, असं राज ठाकरेंनी सांगितले.

Priya More

Pune News: मनसे अध्यक्ष राज ठाकरे (MNS Leader Raj Thackeray) सध्या पुणे दौऱ्यावर आहेत. यावेळी पत्रकारांशी संवाद साधत राज ठाकरे यांनी पुन्हा एकदा रस्त्यावरील खड्डे (Road Potholes), ट्राफिकच्या (Traffic) मुद्द्यावरुन आक्रमक होत प्रशासनाला धारेवर धरले आहे. खड्ड्यांविरोधात जनता एकत्र येत नाही आणि जनतेचा राग जोपर्यंत मत पेट्यांमधून दिसत नाही. तोपर्यंत रस्त्यांवरील खड्डे बुजणार नाहीत, असं म्हणत राज ठाकरे यांनी जनतेलाच जबाबदार धरलं आहे.

राज ठाकरे हे पुण्यातील पक्षाच्या जनसंपर्क कार्यालयाचे उद्धाटन करण्यात आले होते. यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. त्यांनी सांगितले की, 'हे खड्डे पहिल्यांदाच पडलेले नाहीत. गेल्या अनेक वर्षांपासून हे खड्डे पडत असून लोक त्यातूनच प्रवास करत आहोत. पण मला जनतेचं आश्चर्य वाटत आहे. जे लोकप्रतिनिधी तुम्ही निवडून देता तेच हे खड्ड्यांचे प्रश्न उभे करतात आणि प्रत्येकवेळी जाती, धर्माच्या नावे त्यांना निवडून देता.

'तुम्ही जर असे करत असाल तर तुमचे प्रश्न सुटणारच नाहीत. लोकं आपल्या समस्यांकडे दुर्लक्ष करत परत त्यांनाच निवडून देतात. जोपर्यंत मतपेटीतून राग व्यक्त होत नाही तोपर्यंत हे खड्डे बुजणार नाहीत. आजपर्यंत मनसेने अनेक विषयांवर आंदोलनं केली. पण पदरी काय पडलं? तर सर्वाथाने नुकसान करणाऱ्यांना तुम्ही निवडून देता याचंच मला आश्चर्य वाटतं.' असं म्हणत राज ठाकरेंनी राग व्यक्त केला. 'पण तरीही पुण्यात आमची आंदोलनं सुरु आहेत. मुंबई-गोवा, मुंबई-नाशिक येथेही आंदोलनं सुरु आहेत. यातून सरकारचे डोळे उघडतील अशी आशा आहे.', असं राज ठाकरे म्हणाले.

यावेळी मनसेच्या कार्यकर्त्यांकडून होणाऱ्या तोडफोडीवर देखील त्यांनी मत व्यक्त केले आहे. त्यांनी सांगितले की, 'प्रत्येकजण वेगवेगळ्या प्रकारे आंदोलन करत आहे. सगळीकडे तोडफोड करण्याची गरज नाही. लोकांना त्रास होणार नाही याची काळजी घ्या. रस्त्यावरुन महिला, गरोदर महिला जात असतात. ज्यांच्यासाठी आंदोलन करत आहोत त्यांनाच त्रास होऊ नये याची दक्षता घ्या.', असे देखील राज ठाकरे यांनी यावेळी मनसे कार्यकर्त्यांना सांगितले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pune News: पुण्यात फायनान्स कंपनीविरोधात शिंदेसेना आक्रमक, शेतकऱ्याच्या घराचं सील तोडलं

Train Accident: २ प्रवासी ट्रेनची एकमेकांना धडक, आतापर्यंत ४ प्रवाशांचा मृत्यू; ८८ जण गंभीर जखमी

Monday Horoscope: या राशींच्या आयुष्यात होणार मोठे बदल! कोणाला मिळणार पैशांचा लाभ? वाचा राशिभविष्य

Weight Loss Tips : वजन कमी करण्याचं सिक्रेट; 5 पदार्थ दररोजच्या आहारातून करा हद्दपार

Khan Saree Designs: महिलांसाठी खणाच्या साड्यांच्या लेटेस्ट डिझाईन्स, हे 5 पॅटर्न्स दिवाळीत दिसतील उठून

SCROLL FOR NEXT