Pune Accident Saam Tv
मुंबई/पुणे

Pune Accident : पुण्यात भीषण अपघात, डंपर अचानक राँग साईडला गेला, पिकअपला उडवलं, दोघांचा जागीच मृत्यू

Accident News : पुणे जिल्ह्यातील शिरूर तालुक्यातील मांडवगण फराटा येथे गंभीर अपघात झाला आहे. डंपरने राँग साईडने जात पिकअप जीपला धडक दिली. या अपघातात जीपमधील दोघांचा जागीच मृत्यू झाला आहे.

Yash Shirke

रोहिदास गाडगे, साम टीव्ही, प्रतिनिधी

Pune News : पुणे जिल्ह्यातील शिरूर तालुक्यात अपघात झाला आहे. मांडवगण फराटा येथे डंपर आणि पिकअप जीप जोरदार धडक दिल्याने भीषण अपघात घडला आहे. या अपघातात दोघांचा मृत्यू झाला असून एक जण गंभीररित्या जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे. डंपर चालकाच्या चुकीमुळे हा अपघात झाल्याचे म्हटले जात आहे.

मांडवगण फराटा येथे झालेल्या दुर्दैवी अपघातात सागर संभाजी कोळपे (वय २८) आणि यश सुधाकर भिसे (वय १२) यांचा जागीच मृत्यू झाला आहे. तर अनिल बिरा कोळपे हे गंभीर जखमी झाले आहेत. पिकअप जीपला एका डंपरने जोरदार धडक केली. अपघातानंतर चालक घटनास्थळावरून फरार झाल्याचे समोर आले आहे.

डंपर चालकाने चुकीच्या दिशेने वाहन चालवत पिकअपला धडक दिली. अपघात झाल्यानंतर चालक तेथून पळून गेला. शिरूर पोलिसांनी डंपर चालकाच्या विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. चालकाचा शोध सुरु असून पोलीस अधिक तपास करत आहेत. या घटनेमुळे मांडवगण फराटा आणि परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

शिरूर तालुक्यातील मांडवगण फराटा येथे एका डंपरने पिकअप जीपला जोरदार धडक दिली. डंपर चुकीच्या दिशेने येत असताना हा अपघात झाला. या अपघातामध्ये पिकअप जीपमधील दोघांचा जागीच मृत्यू झाला. तर एकजण गंभीररित्या जखमी झाला आहे. जखमी अनिल कोळपे यांच्यांवर रुग्णालयात उपचार सुरु असून त्यांची प्रकृती चिंताजनक आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Bhaji Recipes : झटपट भाजी बनवायचीये? 10 मिनिटांत तयार होणाऱ्या या रेसिपी पाहाच

Maharashtra News Live Update: २०२९ ची निवडणूक देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वातच लढली जाईल

Ketan Agrawal : केतन अग्रवाल हत्या प्रकरणात नवा ट्विस्ट! 'या' कारणामुळे सिया-चेतन निर्दोष सुटण्याची शक्यता?

Pune : पुणे हादरलं! तरुणाने रिक्षात गळफास घेत आयुष्य संपवलं; धक्कादायक कारण समोर

Bone Health: हाडं ठिसूळ किंवा कमकवूत झाली की शरीरात हे 5 मोठे बदल दिसून येतात

SCROLL FOR NEXT