Lokmanya Tilak National Award announced to Pm Narendra Saam Tv
मुंबई/पुणे

Lokmanya Tilak Award: पंतप्रधान मोदी आणि शरद पवार येणार एकाच मंचावर? मोदींना लोकमान्य टिळक पुरस्कार जाहीर

पंतप्रधान मोदी आणि शरद पवार येणार एकाच मंचावर? मोदींना लोकमान्य टिळक पुरस्कार जाहीर

साम टिव्ही ब्युरो

Pm Modi in Pune: राष्ट्रवादीत मोठी फूट पडल्यानंतर आता पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार हे एकाच मंचावर दिसू शकतात. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. लोकमान्य टिळक स्मारक ट्रस्टच्या वतीने हा पुरस्कार पंतप्रधान मोदी यांना १ ऑगस्ट रोजी प्रदान करण्यात येणार आहे.

मोदींना ट्रस्टचे अध्यक्ष डॉ. दीपक टिळक यांच्या हस्ते हा पुरस्कार देण्यात येणार. या कार्यक्रमाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार हे राहणार उपस्थितीत राहणार आहेत. याच कार्यक्रमचं आमंत्रण शरद पवार यांनाही देण्यात आलं आहे.

यातच राष्ट्रवादी पक्षात मोठी फूट पडल्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार हे देखील पहिल्यांदाच शरद पवार यांच्यासोबत मंचावर दिसू शकतात. असं असलं तरी शरद पवार यांनी अद्याप या कार्यक्रमाचं आमंत्रण स्वीकारलं आहे की नाही, याबाबत अद्याप कोणतीही माहिती समोर आलेली नाही. (Latest Marathi News)

तत्पूर्वी पंतप्रधान मोदी यांनी राष्ट्रवादीचा 70 हजार कोटींचा घोटाळा असल्याचा आरोप 27 जून रोजी केला होता. याच्या अगदी काहीच दिवसानंतर राष्ट्रवादीत फूट पाडत अजित पवार शिवसेना आणि भाजप सरकारमध्ये सामील झाले होते. त्यांनी उपमुख्यमंत्रीपदाची तर इतर आठ नेत्यांनी मंत्रपदाची शपथ घेतली.

यावरूनच शरद पवार यांनी पंतप्रधान मोदींवर टाका केली होती. ते म्हणाले होते की, ''राष्ट्रवादीच्या नेत्यांवर भ्रष्टाचाराचे आरोप करणाऱ्या पंतप्रधान मोदींनी या नेत्यांची पूर्ण ताकदीने चौकशी करावी. आम्ही तुम्हाला जाहीर पाठिंबा देऊ.'' अशातच आता हे दोन्ही नेते एकाच मंचावर येणार का? हे पाहावं लागेल.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: रोहित आर्य एन्काऊंटर प्रकरणाचा तपास क्राइम ब्रँचकडे?

Raj Thackeray: सुट्टी दिली नाही तर बॉसच्या कानाखाली मारा; राज ठाकरे असं का म्हणाले? VIDEO

Ind vs Aus Semi Final: ऑस्ट्रेलियाचा तडाखा, ३३९ धावांचं टार्गेट; भारत फायनल गाठणार का?

Rohit Arya Encounter: रोहित आर्यचा एन्काऊंटर कसा झाला? पवई गोळीबाराची इनसाइड स्टोरी

Raj Thackeray Speech : EVM व्होटचोरी डेमो ते १ तारखेचा मोर्चा; राज ठाकरेंच्या भाषणातील 10 ठळक मुद्दे

SCROLL FOR NEXT