Pune News Saam Tv
मुंबई/पुणे

Pune News: पुण्यात १२ लाख रुपयांची दारूचे बॉक्स लंपास; गुन्हा दाखल

पुण्यातील चोरट्यांनी आता मोटासायकल, सोने, चांदी नव्हे तर चक्क दारूच्या बाटल्या पळवून नेल्याचा प्रकार समोर आला आहे.

साम टिव्ही ब्युरो

पुणे : पुण्यातील (Pune) चोरट्यांनी आता मोटासायकल, सोने, चांदी नव्हे तर चक्क दारूच्या बाटल्या पळवून नेल्याचा प्रकार समोर आला आहे. तब्बल साडे बारा लाख रुपयांच्या वाईनच्या बाटल्याच चोरट्यांनी पळवून नेल्याची घटना समोर आली आहे.

हा सगळा प्रकार पुण्यातील सासवड रस्त्यावरील वाईन एन्टरप्रायझेस नावाच्या गोडाऊनमध्ये घडला. या गोडाऊनमध्ये संतोष केशवे (वय 33, रा. शेवाळेवाडी) हे व्यवस्थापक म्हणून काम करतात. शनिवारी नेहमीप्रमाणे त्यांनी सायंकाळी सहा वाजता संबंधीत गोडाऊन बंद केले. दरम्यान, सोमवारी पहाटेच्या सुमारास चोरट्यांनी त्यांच्या गोडाऊनच्या पाठिमागील भिंत फोडली आणि गोडाऊनमध्ये ठेवलेली विविध कंपन्यांचे वाईन बॉक्‍स असलेली खोकी चोरुन नेली.

चोरट्यांनी गोडाऊनमधील तब्बल १२ लाख ६५ हजार रुपये किंमतीचे वाईन बॉक्‍स पळवून नेले आहेत. केवळ तेवढ्यावरच न थांबता चोरट्यांनी दुकानातील सीसीटीव्ही चित्रीकरण साठविणारी डिव्हीआर यंत्रणा देखील चोरुन नेली. सोमवारी सकाळी हा प्रकार उघडकीस आला. त्यानंतर हडपसर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा तपास पोलीस करत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pitru Paksha : पितरांना प्रसन्न करण्यासाठी बनवा तांदळाची खीर, श्राद्धाच्या नैवेद्यासाठी अगदी सोपी रेसिपी

Heart attack - घरी एकटे असताना हार्ट अटॅक आला तर काय कराल? 'या' ३ गोष्टी वाचवू शकतात तुमचा जीव

सुप्रीम कोर्टाचा निवडणूक आयोगाला मोठा झटका, थेट नोटीस पाठवली, सुनावणीत काय घडलं?

Shraddha ritual: श्राद्धाच्या दिवशी कावळा आला नाही तर ते अन्न कोणाला द्याल? जाणून घ्या नियम

Maharashtra News Live Update : ऊस दराच्या मागणीसाठी शेतकरी संघटनांचा दिल्लीत एल्गार; आज जंतर-मंतरवर आंदोलन

SCROLL FOR NEXT