Amitesh Kumar Saam tv
मुंबई/पुणे

Amitesh Kumar: अमितेश कुमार पुण्याचे नवीन पोलीस आयुक्त, कशी आहे कारकिर्द?

police commissioner of pune : पुण्याच्या पोलीस आयुक्तपदी नव्याने अमितेश कुमार यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

Vishal Gangurde

अक्षय बडवे, पुणे

Pune News:

पुण्याच्या पोलीस आयुक्तपदी नव्याने अमितेश कुमार यांची नियुक्ती करण्यात आली आहे. अमितेश कुमार यांची सप्टेंबर २०२० रोजी नागपूर पोलीस आयुक्त म्हणून निवड करण्यात आली होती. त्यानंतर आज बुधवारी अमितेश कुमार यांची पुण्याच्या नवीन पोलीस आयुक्तपदी नियुक्ती करण्यात आली आहे. (Latest Marathi News)

कशी आहे अमितेश कुमार यांची कारकिर्द?

अमितेश कुमार यांची पुण्याचे नवीन पोलीस आयुक्त नियुक्ती करण्यात आली आहे. नागपूरच्या आयुक्तपदी सर्वाधिक काळ राहण्याचा विक्रम त्यांच्या नावार आहे. १९९५ च्या बॅचचे आयपीएस अधिकारी अमितेश कुमार यांनी औरंगाबाद शहराचे पोलीस आयुक्त म्हणून जबाबदारी सांभाळली आहे. तसेच त्यांनी मुंबई वाहतूक पोलीस शाखेच्या सहआयुक्त म्हणूनही काम केलं आहे. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

नागपूर पोलीस आयुक्त होण्याआधी अमितेश कुमार हे राज्य गुप्तवार्ता विभागात सहआयुक्त म्हणून कार्यरत होते.

२००७ मध्ये भारत विरुद्ध क्रिकेट सामना खेळत असताना वेस्ट इंडिजचा क्रिकेटपटू मरलोन सॅम्युअल आणि कुख्यात डॉन दाऊद इब्राहिमचा हस्तक मनोज कोचर यांच्यामधील होणारी बातचीत रेकॉर्ड करून क्रिकेट विश्वात खळबळ उडाली होती. या कामगिरीमुळे अमितेश कुमार यांची संपूर्ण राज्यात चर्चा झाली होती.

प्रवीण पवार पुण्याचे पोलीस सह आयुक्त

पुण्याच्या सहआयुक्तपदी प्रवीण पवार यांची नियुक्ती करण्यात आली आहे. प्रवीण पवार याआधी कोकण परिक्षेत्र विशेष पोलिस महानिरीक्षक म्हणून कार्यरत होते. पुण्याचे तत्कालीन आयुक्त रितेश कुमार यांची महसमदेशक, होमगार्ड येथे बदली करण्यात आली आहे. पुणे ग्रामीणचे अधिक्षक अंकित गोयल यांची गडचिरोली परिक्षेत्रात पोलीस उप महानिरीक्षक म्हणून बदली करण्यात आली आहे.

पंकज देशमुख पुणे ग्रामीणचे नवे पोलीस अधीक्षक

पुण्याचे तत्कालीन पोलीस सह आयुक्त रामनाथ पोकळे यांची अमरावती परिक्षेत्रात विशेष पोलीस महानिरीक्षक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. त्यामुळे पुणे ग्रामीणचे नवे पोलीस अधीक्षकपदी पंकज देशमुख यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: छत्रपती संभाजीनगरमध्ये आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त आज सामुहिक योगासनांचा सराव

Vat Purnima 2026 : ना मैदा, ना गहू; यंदा वटपौर्णिमेला बनवा फणसाची पुरी, एक घास खाताच नवरोबा खुश

Diabetes control: आहारातील हे ३ बदल करतील मधुमेहाचा धोका कमी

Bharli Vangi Recipe: घरच्या घरी झटपट बनवा गावरान स्टाईल चविष्ट भरली वांगी, वाचा सोपी रेसिपी

Cancer- Acidity : ॲसिडीटीकडे दुर्लक्ष करणे पडेल महागात, असू शकतो कॅन्सरचा धोका

SCROLL FOR NEXT