Pune Hit And Run Case Latest Updates:  Saamtv
मुंबई/पुणे

Pune Hit And Run: पुण्यात पोलीस कर्मचाऱ्यांना कारने उडवणारा आरोपी अखेर सापडला; पोलिसांनी काही तासांतच शोधलं

Pune Hit And Run Case Latest Updates: भरधाव कारने पाठीमागून धडक दिल्याने खडकी पोलीस ठाण्यातील कर्मचारी समाधान कोळी यांचा मृत्यू झाला. खडकी भागात असलेल्या हरीश पुलाजवळ रात्री दीड वाजता ही घटना घडली.

Gangappa Pujari

अक्षय बडवे, ता. ८ जुलै २०२४

मुंबईच्या वरळीमधील हिट अँड रन प्रकरण ताजे असतानाच पुण्यामध्ये पुन्हा एकदा भीषण अपघात घडला आहे. शहरातील खडकी भागात घडलेल्या हिट अँड रनमध्ये खडकी पोलीस ठाण्यातील कर्मचारी समाधान कोळी यांचा मृत्यू झाला. खडकी भागात असलेल्या हरीश पुलाजवळ रात्री दीड वाजता ही घटना घडली. या प्रकरणी आता मोठी अपडेट समोर आली असून कारचालकाला ताब्यात घेण्यात आले आहे.

याबाबत सविस्तर माहिती अशी की, भरधाव कारने पाठीमागून धडक दिल्याने खडकी पोलीस ठाण्यातील कर्मचारी समाधान कोळी यांचा मृत्यू झाला. खडकी भागात असलेल्या हरीश पुलाजवळ रात्री दीड वाजता ही घटना घडली. एका भरधाव जात असलेल्या चार चाकी गाडीने गस्तीवर असलेल्या दोन पोलीस कर्मचाऱ्यांच्या दुचाकीला धडक दिली.

या अपघातात एका कर्मचाऱ्याचा जागीच मृत्यू झाला तर दुसऱ्या कर्मचाऱ्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.याप्रकरणी मोठी अपडेट समोर आली असून कार चालकाला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. सिद्धार्थ केंगार असे या तरुणाचे नाव आहे. सिद्धार्थ हा एका कार सर्व्हिस सेंटर मध्ये काम करत असल्याचे सांगण्यात येत आहे.

या तरुणाला वैद्यकीय चाचणी साठी रुग्णालयात नेण्यात आले आहे. तसेच अपघातातील गाडीही जप्त करण्यात आली आहे. पुण्यातील खडकी पोलीस ठाण्यात आरटीओचे अधिकारी दाखल झाले असून गाडीची तपासणी केली जाणार आहे. पुणे पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Chakli Recipe: मुलांसाठी घरच्या घरी बनवा कुरकुरीत चकली, जाणून घ्या सोपी आणि जलद रेसिपी

Chocolate Recipe: फक्त 'या' ४ पदार्थांपासून बनवा चॉकलेट, तोंडात टाकताच विरघळेल

Maharashtra Live News Update: मुंबई स्फोटकांनी उडवून देण्याच्या कालच्या थ्रेडनंतर मुंबई पोलिस सतर्क

Anant Chaturdashi 2025 live updates : लालबागचा राजा मंडपातून बाहेर; फुलांचा वर्षाव करत मानवंदना; VIDEO

Red Fort Heist : राजधानीत सुरक्षेचा चिंधड्या, किल्ल्यामधून १ कोटींच्या सोन्याचा कलश चोरीला

SCROLL FOR NEXT