Pune Rajgad Rikshaw Accident News Saamtv
मुंबई/पुणे

Pune Accident: भरधाव रिक्षा कठड्याला धडकली, भीषण अपघातात माय- लेकाचा करुण अंत; मन सुन्न करणारी घटना

Gangappa Pujari

सागर आव्हाड, पुणे

Pune Accident Mother Son Death: पुण्याच्या राजगड तालुक्यातील रांजणे गावच्या हद्दीत रिक्षाचा भीषण अपघात झाला. तालुक्यात रात्रीच्या सुमारास वादळी वाऱ्यासह झालेल्या मुसळधार पावसाने रस्त्यावर झाड पडले होते. रस्त्यामध्ये अचानक झाड पडलेले दिसल्याने चालकाचे नियंत्रण सुटून रिक्षा कठड्याला धडकली. या भयंकर अपघातात माय-लेकाचा दुर्दैवी मृत्यू झाला. तर एक महिला गंभीर जखमी झाली आहे. या घटनेने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.

पुण्याच्या राजगड तालुक्यातील रांजणे गावच्या हद्दीत झालेल्या रिक्षा अपघातात मायलेकाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. संबंधित रिक्षा पाबे घाट मार्गे पुण्याच्या दिशेने जात असताना अचानक पुढं झाडं पडलेले दिसल्यानं चालकाचे नियंत्रण सुटले. यावेळी रिक्षा कठड्याला धडकल्याने ही दुर्घटना घडली. यामध्ये मायलेकाचा दुर्दैवी मृत्यू झाला. शालन पासलकर (वय.६५), दिपक पासलकर (वय.४५) असं मृत्यू झालेल्या दोघा मायलेकांची नावे आहेत. कविता मरळ ह्या जखमी झाल्यात.

समोर आलेल्या माहितीनुसार, आई शालन आणि मुलगा दीपक हे रिक्षाने कानंद येथे मुलीकडे गेले होते. तालुक्यात रात्रीच्या सुमारास वादळी वाऱ्यासह झालेल्या मुसळधार पावसाने अनेक ठिकाणी झाडे पडली होती. दोघे माय- लेक प्रवास करत असलेल्या रांजणे याठिकाणीही मुख्य रस्त्यावर झाडे पडलेले होते. रिक्षा तीव्र उतारावर असतानाच चालकाला पडलेले झाड दिसल्याने त्याचे वाहनावरील नियंत्रण सुटले.

यावेळी भरधाव रिक्षा थेट जवळच्या कठड्याला धडकली ज्यामध्ये दोघांचाही दुर्दैवी मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच स्थानिक रेस्क्यू टीमने रात्रीच्या अंधारात तात्काळ घटनास्थळी धाव घेत, मदत कार्य करत पडलेले झाड कापून रस्ता वाहतुकीसाठी मोकळा केला. अपघातात मृत्यू पावलेल्या दोघांचेही मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवले आहेत. पोलीस याबाबतचा अधिक तपास करत आहेत.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Atul Londhe News: अतुल लोंढेंवर शाहांचा खोटा व्हिडिओ दाखवल्याप्रकरणी गुन्हा

Marathi News Live Updates : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज दिल्ली दौऱ्यावर येण्याची शक्यता

DA Hike: १ कोटी कर्मचाऱ्यांची दिवाळी होणार गोड; महागाई भत्त्यात ३ टक्क्यांनी वाढ होण्याची शक्यता

Firecrackers Godown Blast : फटाक्याच्या गोडाऊनमध्ये स्फोट; एकाचा मृत्यू, एक जण जखमी

Maharashtra Politics: 'भाजपासाठी मी माझा बळी दिला', केसरकर यांच्या अडचणी वाढणार? महायुतीतील अंतर्गत वाद चव्हाट्यावर

SCROLL FOR NEXT