Pune News Saam Tv
मुंबई/पुणे

Pune News: पुणेकरांसाठी आनंदाची बातमी! यंदाही मिळकतकरात वाढ नाही; ९ वर्षांपासून एकच दर

Pune MNC Do Not Increase Property Tax: पुणेकरांसाठी दिलासादायक बातमी आहे. पुणे महानगरपालिकेने यंदाही मिळतकरात वाढ न करण्याचा निर्णय घेतला आहे.

Siddhi Hande

पुणेकरांसाठी आनंदाची बातमी आहे. पुणेकरांना यंदा महापालिकेकडून दिलासा मिळाा आहे. यंदा मिळकतकरात कोणतीही वाढ होणार नाहीये. त्यामुळे सर्वसामान्यांना दिलासा मिळाला आहे. मिळकतकर स्थिर असेल तर सर्वसामान्य नागरिकांच्या खिशाला कात्री बसणार नाही. (Pune News)

यंद मिळकतकरामध्ये कोणत्याही स्वरुपाची वाढ न करण्याचा प्रस्ताव स्थायी समितीसमोर सादर करण्यात आला होता. वाढत्या महागाईमुळे आधीच सर्वसामान्य नागरिक चिंतेत आहे. त्यात मिळकतकरात वाढ केली असती तर सर्वसामान्यांना चांगलाच फटका बसला असता.त्यामुळेच पुणेकरांना महापालिकेकडून चालू आर्थिक वर्षात मिळकतकरात कोणत्याही स्वरुपाची वाढ केली जाणार नसल्याने चांगलाच दिलासा मिळणार आहे.

२०२५-२०२६ या आर्थिक वर्षासाठी मिळकतकरात कोणतीही वाढ होणार नसल्याचे सांगितले आहे. पुणे महापालिका प्रशासनाकडून मागील ९ वर्षात मिळकतकरात कोणतीही वाढ करण्यात आलेली नाही. दरम्यान,२०२५-२६ या आर्थिक वर्षाचे अंदाजपत्रक तयार करण्याचे काम महापालिका प्रशासनाकडुन सुरु आहे. त्यामुळे २० फेब्रुवारीपुर्वी करवाढीबाबतचा निर्णय घेणे महापालिका प्रशासनास बंधनकारक आहे.मात्र मागील तीन वर्षांपासुन महापालिकेत प्रशासकराज आहे, महापालिकेची सर्वसाधारण सभा आता अस्तित्वात नाही.

पुणे महापालिकेने 2010-11 मध्ये मिळकत करामध्ये 16 टक्के, 2013-14 मध्ये 6 टक्के तर 2015-16 या आर्थिक वर्षाच्या अंदाजपत्रकात मिळकत करामध्ये 10 टक्के करवाढ केली होती. तेव्हापासुन आत्तापर्यंत करवाढ झालेली नाही.तेव्हापासुन आत्तापर्यंत करवाढ झालेली नाही.यंदाही मिळकतकरात वाढ न झाल्याने सर्वसामान्यांना दिलासा मिळणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Chanakya Niti: यशस्वी व्यक्ती कसं बनायचं? गाढवाच्या या ५ गुणांपासून घ्या प्रेरणा, चाणक्यांचा सल्ला वाचा...

Maharashtra News Live Update: अंबरनाथमध्ये शिवसेना-भाजप युती ठरली? राजकीय सस्पेन्स कायम

PBKS vs MI: तिलक वर्माची तुफानी खेळी, ६ विकेट राखत मुंबईचा विजय; पंजाबचा सलग पाचवा पराभव

Pollution: हवेतील प्रदूषण होणार कमी; 'शेवाळ' गिळणार कार्बन डायऑक्साईड

दोन दिवस वर्क फ्रॉम होम; मंत्र्यांचे परदेश दौरे रद्द, नवीन वाहन खरेदीवर बंदी; सरकारचे मोठे निर्णय

SCROLL FOR NEXT