Guillain Barre Syndrome Saam Tv News
मुंबई/पुणे

Guillain Barre Syndrome: मोठी बातमी! मेंदू व्हायरसचं थैमान, सोलापूरच्या तरूणाचा पुण्यात मृत्यू, प्रशासन अलर्ट

Solapur youth Died Due To GBS: पुण्यामध्ये गुलियन बॅरी सिंड्रोम या आजाराने एका तरुणाचा मृत्यू झाला आहे. या आजारामुळे मृत्यू झाल्याचे हे पहिले प्रकरण आहे. त्यामुळे पुण्यामध्ये सध्या खळबळ उडाली आहे.

Priya More

अक्षय बडवे, पुणे

पुण्यामध्ये गुलियन बॅरी सिंड्रोम या आजाराने थैमान घातलं आहे. या आजारामुळे पुणेकरांमध्ये भीतीचे वातावरण आहे. गुलियन बॅरी सिंड्रोममुळे पुणेकरांचे टेन्शन आणखी वाढत चालले आहे. अशामध्ये गुलियन बॅरी सिंड्रोम या आजारामुळे पुण्यात एका तरुणाचा मृत्यू झाला आहे. सोलापूरच्या तरुणाचा पुण्यामध्ये उपचारादरम्यान मृत्यू झाला. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, पुण्यातील गुलियन बॅरी सिंड्रोम या आजाराने बाधित रुग्णाचा मृत्यू झाला. पुण्यातील डीएसके विश्वमध्ये राहणाऱ्या तरुणाला काही दिवसांपूर्वी गुलियन बॅरी सिंड्रोम या आजाराची लागण झाली होती. त्याच्यावर रुग्णालयामध्ये उपचार सुरू होते. पण उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. गुलियन बॅरी सिंड्रोम या आजारामुळे तरुणाचा मृत्यू झाल्याची ही पहिलीच घटना आहे.

मूळचा सोलापूर जिल्ह्यातील असणारा तरुण पुण्यातील धायरी परिसरात असणाऱ्या डीएसके विश्व या ठिकाणी वास्तव्यास होता. काही दिवसांपूर्वीच या तरुणाला पुण्यात गुलियन बॅरी सिंड्रोम या आजाराची लागण झाली होती. गुलियन बॅरी सिंड्रोममुळे तब्बेत खालावल्याने त्याला सोलापूरच्या एका खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं होतं.

हा तरूण बरा होऊन काहीच दिवसांपूर्वी अतिदक्षता विभागातून बाहेर आला होता. परंतु परत श्वासनाचा त्रास झाल्याने आणि प्रकृती आणखी खालवल्यामुळे या तरुणाला उपचारासाठी पुण्यामध्ये हलवण्यात आले होते. पुण्यातील रुग्णालयामध्ये उपचार सुरू असताना या तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाला. दरम्यान, पुण्यामध्ये सध्या गुलियन बॅरी सिंड्रोम या आजाराची लागण झालेल्या रुग्णांची संख्या ७३ वर पोहचली आहे. यामधील १४ जण व्हेंटिलेटरवर आहेत. या आजारामुळे पुणे महानगर पालिका अलर्ट मोडवर असून उपाययोजना करत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update : ऊस दराच्या मागणीसाठी शेतकरी संघटनांचा दिल्लीत एल्गार; आज जंतर-मंतरवर आंदोलन

Garba Jhumka Designs : नवरात्रीत घाला 'हे' ८ ट्रेंडी डिझाइनचे झुमके, गरबा लूक दिसेल एकदम हटके

Kidney Health: राजमा खाल्ल्याने किडनी खरोखरच दुरुस्त होते का? 'हा' धक्कादायक खुलासा वाचून चकित व्हाल

Amla juice: सकाळी रिकाम्या पोटी प्या एक ग्लास आवळ्याचा रस; मिळतील हे 4 फायदे

Mumbai Crime: गार्डमध्ये जाऊन ड्रग्जचं इंजेक्शन घेतलं, मुंबईत तरुणाचा तडफडून मृत्यू

SCROLL FOR NEXT