Kalicharan Maharaj Saamtv
मुंबई/पुणे

Kalicharan Maharaj: धार्मिक तेढ वाढवणारे वक्तव्य... कालिचरण महाराजांविरोधात गुन्हा दाखल; काय आहे प्रकरण?

Pune News: पुण्यातील सिंहगड रोड पोलिस ठाण्यात कालीचरण महाराजांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Gangappa Pujari

अक्षय बडवे, प्रतिनिधी...

Kalicharan Maharaj News: आपल्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे चर्चेत येणारे कालीचरण महाराज पुन्हा एकदा अडचणीत आले आहेत. भडकावू भाषण दिल्याप्रकरणी पुण्यातील सिंहगड रोड पोलिस ठाण्यात कालीचरण महाराजांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (Pune Latet News)

याबाबत सविस्तर माहिती अशी की, छत्रपती शिवाजी महाराज जयंती निमित्त "हिंदू जनजागरण सभा" या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. पुण्यातील (Pune) सिंहगड पोलीस स्टेशनच्या हद्दीतील सनसिटीरोड जवळ हा कार्यक्रम पार पडला होता.

या कार्यक्रमासाठी कालीचरण महाराज (Kalicharan Maharaj) यांना आमंत्रित केले होते. कार्यक्रमात बोलताना जात, धर्म, भाषा व प्रादेशिक गट यांच्यात शत्रुत्वाची भावना निर्माण होईल आणि हिंदू, मुस्लिम, ख्रिश्चन या धर्मांच्या विरोधात भाषण केल्याचा आरोप कालीचरण महाराजांवर लावण्यात आला आहे.

याच प्रकरणात कालीचरण महाराज उर्फ अभिजीत धनंजय सराग यांच्याविरोधात सिंहगड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. पोलीस याबाबतचा अधिक तपास करत आहेत. दरम्यान, आपल्या भाषणामुळे अडचणीत येण्याची ही पहिलीच वेळ नाही, याआधीही भडकावू भाषण केल्याप्रकरणी कालीचरण महाराजांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. (Latest Marathi News)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

समुद्रात भयंकर दुर्घटना! २४० प्रवाशांनी भरलेले जहाजच गायब; बचावकार्य सुरू

Gold Rate Today: खुशखबर! सोन्याच्या दरात मोठी घसरण; चांदीही झाली स्वस्त, वाचा 24, 22 आणि १८ कॅरटचे आठवडाभराचे दर

Maharashtra News Live Update: मुसळधार पावसाचा पनवेल बाजार समितीला फटका; ग्राहकांनी फिरवली पाठ

Konkan Travel : गणेशोत्सवाला कोकणात जाणाऱ्या नागरिकांचे हाल, रेल्वे १२ तास उशिराने, महामार्गावर वाहनांच्या लांबलचक रांगा

हार्ट हेल्थसाठी पुरुषांनी रोज किती चालावे? जाणून घ्या

SCROLL FOR NEXT