Pune Crime News Saam tv
मुंबई/पुणे

Pune Crime News: सहकार मंत्र्यांचा सचिव असल्‍याचे सांगत ५९ लाख रूपयांचा गंडा

सहकार मंत्र्यांचा सचिव असल्‍याचे सांगत ५९ लाख रूपयांचा गंडा

साम टिव्ही ब्युरो

सचिन जाधव

पुणे : पुण्यात सहकार मंत्र्यांचे सचिव असल्याचे सांगून गृहकर्ज कमी करुन देतो. तसेच लिलाव झालेला (Pune News) बंगला परत मिळवून देतो; असे सांगून एका सेवानिवृत्त ज्येष्ठ नागरिकाला तिघांनी तब्बल ५९ लाख रुपयांना गंडा घातला आहे. याबाबत येरवडा येथील (Police) पोलिस स्‍टेशनला गुन्‍हा दाखल केला आहे. (Breaking Marathi News)

फिर्यादी हे सेवानिवृत्त असून त्यांची मुले चांगल्या पगाराची नोकरी करतात. त्यांनी कल्याणीनगर येथील बंगला विकत घेण्यासाठी एचडीएफसी (Bank) बँकेकडून ४ कोटी रुपयांचे कर्ज घेतले होते. परंतु, कोरोना काळात त्यांचे गृहकर्जाचे हप्ते थकले. त्यामुळे बँकेने त्यांच्या बंगल्याचा लिलाव करण्याची नोटीस बजावली होती. गोरख तनपुरे व विशाल पवार यांनी गगन रहांडगळे याची सहकार मंत्री बाळासाहेब पाटील यांचे सचिव असल्याचे खोटे (Fraud) सांगून ओळख करुन दिली. त्याने बँकेचे गृहकर्ज कमी करुन देतो. तसेच त्यांचे लिलाव झालेले घर त्यांना परत मिळवून देतो; असे सांगून त्यांच्याकडून वेगवेगळी कारणे सांगून वेगवेगळ्या खात्यांवर पैसे आरटीजीएस (RTGS) करायला सांगितले.

तिघांवर गुन्‍हा दाखल

सदर फिर्यादीने कल्याणीनगर शाखा येथील बँक खात्यातून त्यांना एकूण ५९ लाख रुपये काढून दिले. असे असताना त्यांचे काही एक काम केले नाही. त्यांचा लिलाव झालेला बंगलाही परत मिळवून दिला नाही. त्यामुळे त्यांनी दिलेले पैसे परत मागितले. परंतु, त्यांनी पैसे परत करण्यास टाळाटाळ केली. यानंतर ५९ वर्षाच्या नागरिकाने येरवडा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार पोलिसांनी गोरख तनपुरे (वय ४०), विशाल पवार (वय ३५, दोघे रा. पुणे), गगन केशव रहांडगळे (वय ३८, रा. नागपूर) यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. हा प्रकार कल्याणीनगरमध्ये ऑक्टोबर २०२१ ते आतापर्यंत घडला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Drishyam 3 Cast Fee: 'दृश्यम 3'च्या स्टारकास्टची फी किती? अजय देवगणला तब्बूपेक्षा 528% अधिक मानधन

Pumpkin seeds: कोलेस्ट्रॉल मेणासारखं वितळेल आणि हार्ट अटॅकचा धोकाही होईल कमी, रोज सकाळी खा मूठभर 'या' बिया

Pune Accident: पुण्यात अपघाताचा थरार! भरधाव स्कूल बसची दुचाकीला धडक, विद्यार्थ्याचा जागीच मृत्यू

Maharashtra News Live Update: बीड जिल्ह्यात शेतकरी दुहेरी संकटात गतवर्षी ओला दुष्काळ तर यावर्षी कोरडा दुष्काळ

Political News : राजकीय वर्तुळात मोठी घडामोड! काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांचा तडकाफडकी राजीनामा, 'या' नेत्याकडे दिली जबाबदारी

SCROLL FOR NEXT