Dr. Narendra Dabholkar Case: The Verdict Of The Case Will Be Tomorrow After 10 Years 
मुंबई/पुणे

Dr. Narendra Dabholkar Case: डॉ. दाभोलकर हत्याप्रकरणी मोठी अपडेट; उद्या १० वर्षांनी लागणार खटल्याचा निकाल

Pune News in Marathi: दाभोलकर हत्या प्रकरणाचा निकाल उद्या लागणार असून दाभोलकर कुटुंबियांना तब्बल १० वर्षांनी न्याय मिळणार आहे. या खटल्यात ५ आरोपींवर आरोप निश्चिती करण्यात आलेत.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

सागर आव्हाड

पुणे: महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे संस्थापक डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्याप्रकरणात मोठी अपडेट समोर आलीय. दाभोलकर हत्या प्रकरणाचा निकाल उद्या लागणार असून दाभोलकर कुटुंबियांना तब्बल १० वर्षांनी न्याय मिळणार आहे. या खटल्यात ५ आरोपींवर आरोप निश्चिती करण्यात आले असून उद्या हत्येच्या खटल्याचा निकाल जाहीर केला जाणार आहे.

या गुन्ह्यातील आरोपी डॉ. वीरेंद्रसिंह तावडे, सचिन अंदुरे, शरद कळसकर, संजीव पुनाळेकर आणि विक्रम भावे या ५ जणांवर १५ सप्टेंबर २०२१ ला आरोप निश्चित करण्यात आले आहेत. यातील संजीव पुनाळेकर आणि विक्रम भावे हे दोन आरोपी सध्या जामिनावर बाहेर आहेत. दरम्यान या खटल्याची सुनावणी वर्षभर जिल्हा न्यायाधीश एस.आर. नावंदर यांच्या न्यायालयात सुरू होती. दाभोलकर यांच्या हत्येनंतर बंगळूरमध्ये गौरी लंकेश यांची हत्या झाली होती.

कर्नाटक पोलिसांनी या हत्येचा कट उलगडला असून पत्रकार गौरी लंकेश यांच्या झालेल्या खुनाप्रकरणी कर्नाटक एटीएसने चिंचवडहून अमोल काळे याला ताब्यात घेतले होते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Shubman Gill: बाल बाल बचावला गिल; ब्रूकनं मारलेला चेंडू लागला थेट शुबमनच्या डोक्याला|Video Viral

Maharashtra Live News Update: पंतप्रधान नरेंद्र मोदी ऑर्डर ऑफ द रिपब्लिकने सन्मानित

Badlapur Firing : बदलापूर गोळीबार प्रकरणाला नवं वळण; गाळीबारामागे शिवसेना पदाधिकाऱ्याचा हात?

Eknath Shinde : 'जय गुजरात'च्या घोषणेनंतर एकनाथ शिंदेंचं स्पष्टीकरण, उद्धव ठाकरेंचा VIDEO दाखवत विरोधकांना प्रत्युत्तर

DR. MC Dawar Death : आधी २ रुपये, आता २० रुपयांमध्ये करायचे उपचार; गरीबांचे डॉक्टर पद्मश्री एमली डावर काळाच्या पडद्याआड

SCROLL FOR NEXT