Maharashtra Vidhansabha Election 2024:  Saamtv
मुंबई/पुणे

Indapur Politics: 'आमचं ठरत नसतं, फिक्स असतं!' हर्षवर्धन पाटलांच्या आव्हानाला दत्ता भरणेंचं प्रत्यूत्तर; महायुतीत बॅनरवॉर रंगलं!

Maharashtra Vidhansabha Election 2024: इंदापुरमध्ये राष्ट्रवादीचे काँग्रेसचे आमदार दत्ता मामा भरणेंविरुद्ध माजी आमदार हर्षवर्धन पाटील यांच्यामधील बॅनरवॉरने सर्वांचे लक्ष वेधले आहे.

मंगेश कचरे

पुणे, ता. ४ जुलै २०२४

लोकसभेनंतर आता राज्याच्या राजकारणात विधानसभा निवडणुकांचे वारे वाहू लागले आहेत. एकीकडे विधानसभेसाठी राजकीय पक्षांनी मोर्चेबांधणी सुरू केली असतानाच आता इच्छुकांमध्येही कुरघोड्यांचे राजकारण रंगू लागले आहे. इंदापुरमध्ये राष्ट्रवादीचे काँग्रेसचे आमदार दत्ता मामा भरणेंविरुद्ध माजी आमदार हर्षवर्धन पाटील यांच्यामधील बॅनरवॉरने सर्वांचे लक्ष वेधले आहे.

लोकसभेनंतर विधानसभेच्या चर्चा रंगल्या असताना इंदापुरात भाजप राष्ट्रवादीत बॅनर वाॅर रंगल्याचं पहायला मिळत आहे. आगामी विधानसभेच्या निवडणूकीत इंदापूरच्या जागेचा तिढा सोडवणं हे महायुतीच्या नेत्यांसाठी डोकेदुखी ठरू शकते. इंदापूरमध्ये भाजपाचे माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्या समर्थनार्थ इंदापूरात काल बॅनर लागले होते.

आज राष्ट्रवादीचे माजी मंत्री आमदार दत्तात्रय भरणे यांच्या इंदापूर तालुका राष्ट्रवादी काँग्रेसच्या युवक पदाधिकाऱ्यांनी ही हर्षवर्धन पाटील यांना डिवचलं आहे. ज्या ठिकाणी हर्षवर्धन पाटील यांच्या विमान चिन्हाच्या लागा तयारीला असा मजकूर असणारा बॅनर लागला आहे. हर्षवर्धन पाटील यांच्या या बॅनरमुळे ते अपक्ष लढण्याच्या तयारीत आहेत का? असा सवाल उपस्थित होत आहे.

तर दुसरीकडे त्याच बॅनरच्या अगदी शेजारी दत्ता मामा भरणे समर्थकांनी फ्लेक्स लावले आहेत. 'विकासाची परंपरा कायम राखुया, चला विजयाची हॅट्रीक पूर्ण करुया, आमचं ठरत नसतं तर आमचं फिक्स असतं'. अशा आशयाचा बॅनर लावण्यात आला आहे. त्यामुळे महायुतीत इंदापूरच्या विधानसभेच्या जागेवरुन पुन्हा वाद निर्माण होण्याचे संकेत आत्तापासून पहायला मिळत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

'मराठीचाच अजेंडा'; कोणताच झेंडा नाही, ठाकरे बंधूंच्या विजयी मेळाव्याची निमंत्रण पत्रिका चर्चेत

रशियाच्या हल्ल्याने युक्रेन हादरलं, ट्रम्पसोबत चर्चेनंतर रशियाचा हल्ला; युक्रेनची राजधानी रशियाकडून उध्वस्त?

IND vs ENG Test 2 Day 3: All Out! सिराजच्या भेदक माऱ्यापुढे इंग्लंडची टीम ढेपाळली; भारताकडे 180 धावांची आघाडी

Sushil Kedia : आमच्यासारखा जर खरंच पेटून उठला तर...व्यावसायिक सुशील केडिया यांनी राज ठाकरेंना डिवचलं

ठाकरेंच्या मेळाव्याला काँग्रेस-राष्ट्रवादीची दांडी? ठाकरेंच्या मेळाव्यात मविआचा सहभाग? मराठीवरून मविआत फूट?

SCROLL FOR NEXT