Pune News: Police Inspector passed away Saamtv
मुंबई/पुणे

Pune News: घरात मुलाच्या लग्नाची तयारी; पण नियतीने केला घात... सहाय्यक पोलीस निरीक्षकाचा दुर्देवी मृत्यू

Assistant Police Inspector passed away: घरात मुलाच्या लग्नाची तयारी सुरू असतानाच मृत्यूने गाठल्याने कुटूंबियांवर दुखःचा डोंगर कोसळला आहे...

Gangappa Pujari

संजय जाधव, प्रतिनिधी...

Pune Police: पुणे पोलिस दलातून एक धक्कादायक बातमी सध्या समोर येत आहे.मुलाच्या लग्नासाठी गेल्या काही दिवसांपासुन हक्क रजेवर असणार्‍या पुणे ग्रामीण पोलिस दलातील सहाय्यक पोलिस निरीक्षक भालचंद्र शिंदे यांचा हार्टअटॅकने मृत्यू झाला आहे. या घटनेने कुटूंबियांवर दुखःचा डोंगर पसरला आहे. (Pune Police Death)

याबाबत समोर आलेल्या माहितीनुसार, पुणे ग्रामीण (Pune Police) पोलीस दलातील सहाय्यक पोलीस निरीक्षक शिंदे यांचे ह्रदयविकाराच्या धक्याने दुर्देवी निधन झाले. एपीआय भालचंद्र शिंदे हे पुणे ग्रामीण पोलिस दलातील पौड पोलिस स्टेशनमध्ये कार्यरत होते. त्यांनी त्यांच्या मुलाच्या लग्नासाठी हक्क रजा घेतली होती.

मुलाच्या लग्नाच्या पत्रिकेचे वाटप करत असतानाच त्यांना त्रास होऊ लागला म्हणून त्यांना उपचारासाठी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. उपचारादरम्यान त्यांचा हार्ट अटॅकने मृत्यू झाला आहे. घरात लग्नाची तयारी सुरू असतानाच काळा घातल्याने कुटूंबियांवर दुखःचा डोंगर कोसळला आहे. या घटनेने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे. (Latest Marathi News)

का येतो ह्रदयविकाराचा झटका...

अलिकडच्या काळात ह्रदयविकाराच्या धक्क्याने मृत्यू होण्याचे प्रमाण वाढले आहे. ह्रदययविकाराचा झटका, ज्याला मायोकार्डियल इन्फ्रक्शन देखील म्हणतात, जेव्हा हृदयाच्या स्नायूच्या एका भागाला पुरेसे रक्त मिळत नाही तेव्हा ही समस्या उद्भवते. हृदयाचा स्नायू रक्त प्रवाह पुनर्संचयित करण्यासाठी उपचारांशिवाय जितका जास्त काळ चालू ठेवतो, तितके जास्त नुकसान होते.

कोरोनरी आर्टरी डिसीज (CAD) हे हृदयविकाराचे सामान्य कारण आहे. तीव्र उबळ किंवा कोरोनरी धमनीचे अचानक आकुंचन, ज्यामुळे हृदयाच्या स्नायूंना रक्तपुरवठा खंडित होतो, हे देखील हृदयविकाराचे एक कारण आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Premanand Maharaj : प्रेमानंद महाराजांची तब्बेत बिघडली, वृंदावनमधील पदयात्रा रद्द

Govinda : गोविंदाच्या इव्हेंटमध्ये राडा! बाउन्सरने धक्काबुक्की केल्याने वाद चिघळला, VIDEO व्हायरल

Chole Bharture Recipe: स्ट्रीट स्टाईल चमचमीत छोले भटुरे बनवायचेत; फॉलो करा ही स्टेप बाय स्टेप रेसिपी

Bharli Gilki Recipe: गिलक्याची भाजी आवडत नाही? मग एकदा ट्राय करा झणझणीत भरली गिलकी, शुन्य मिनिटांत जेवण होईल फस्त

Balushahi Recipe: झटपट घरीच बनवा खुसखुशीत आणि रसाळ बालूशाही, वाचा सोपी रेसिपी

SCROLL FOR NEXT