rajendra hagawane x
मुंबई/पुणे

Pune News : हुंड्यासाठी छळ अन्...; अजितदादांच्या बड्या नेत्याच्या सुनेनं जीवन संपवलं, पुण्यातील NCP चा शिलेदार कारवाईच्या भोवऱ्यात

Ajit Pawar राष्ट्रवादी गटातील नेते राजेंद्र हगवणे अडचणीत सापडले आहेत. त्यांच्या सुनेने आत्महत्या केली आहे. हुंड्यासाठी हगवणे कुटुंबिय सुनेला मानसिक आणि शारीरिक त्रास देत होते. या त्रासाला कंटाळून हा निर्णय घेतल्याचा आरोप होत आहे.

Yash Shirke

अजित पवार गटाचे नेते राजेंद्र हगवणे यांच्या सुनेने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. हुंड्यासाठी शारीरिक आणि मानसिक त्रास केल्याने पीडितेने हे कृत्य केल्याचा आरोप होत आहे. या प्रकरणी बावधन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणामुळे राजेंद्र हगवणे अडचणीत सापडल्याचे म्हटले जात आहे.

राष्ट्रवादी पवार गटाचे नेते राजेंद्र हगवणे यांची सून वैष्णवी शशांक हगवणे यांनी मुळशी तालुक्यातील भुकूम येथे शुक्रवारी (१६ मे) रोजी दुपारी चारच्या सुमारास गळफास घेऊन आत्महत्या केली. सासरच्या मंडळींकडून हुंड्यासाठी होणाऱ्या छळाला कंटाळून वैष्णवी यांनी आत्महत्या केल्याचा आरोप माहेरच्यांनी केला आहे. वैष्णवी यांचे वडील आनंद ऊर्फ अनिल कस्पटे यांनी शनिवारी (१७ मे) रोजी बावधन पोलीस ठाण्यात तक्रार केली. वैष्णवीचे पती, सासू, सासरे यांच्या विरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पती, सासू आणि नणंदेला अटक झाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, वैष्णवी यांनी घरातील बेडरुमचा दरवाजा बंद केला आणि गळफास घेत आत्महत्या केली. दरवाजा न उघडल्याने वैष्णवी यांच्या पतीने दरवाजा तोडला. तेव्हा हा प्रकार उघडकीस आला. वैष्णवी यांना रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी उपचार करण्यापूर्वीच मृत्यू झाल्याची घोषणा केली. ससून रुग्णालयात पोस्टमार्टम करण्यात आले.

वैष्णवीचे पती (शशांक राजेंद्र हगवणे), सासू (लता राजेंद्र हगवणे), सासरा (राजेंद्र तुकाराम हगवणे), नणंद (करिश्मा राजेंद्र हगवणे), दीर (सुशील राजेंद्र हगवणे) यांनी हुंड्यासाठी छळ केला. तिच्या मृत्यूस हेच लोक कारणीभूत असल्याचे आरोप वैष्णवीच्या वडिलांनी केला आहे. राजेंद्र हगवणे हे अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे मोठे नेते आहेत, हगवणेंवर गुन्हा दाखल झाल्याने परिसरात खळबळ उडाली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: खासदार ओमराजे निंबाळकर धाराशिवला जाणार

Digital Pyament Alert : डिजिटल पेमेंट करण्यापूर्वी १० महत्त्वाच्या गोष्टी डोक्यात ठेवा, नाहीतर...

खासदार आष्टीकरांच्या खास माणसाचा सुषमा अंधारेंना फोन; कॉलवर नेमकं काय बोलणं झालं? VIDEO

फक्त इडली-डोसा नाही! यंदा पावसाळ्यात ट्राय करा 'हे' 5 गरमागरम साऊथ इंडियन पदार्थ

Gingee Fort : जिंजी किल्ला पाहायला जाताय? मग जवळच असलेली ‘ही’ ५ स्वर्गाहून सुंदर हिल स्टेशन्स नक्की फिरा

SCROLL FOR NEXT