Pune Accident Saamtv
मुंबई/पुणे

Pune Accident: रस्त्याचा अंदाज चुकल्याने भीषण अपघात! बोलेरो जीप १५० फूट दरीत कोसळली; सुदैवाने चालक बचावला

Pune Accident: सोमवारी (१२, फेब्रुवारी) रात्री १० वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवितहानी झालेली नाही.

Gangappa Pujari

सचिन जाधव, पुणे|ता. १३ फेब्रुवारी २०२४

Pune Accident News:

पुण्याहून भोरमार्गे महाडला जाणाऱ्या मार्गावरील वरंध घाटात बोलेरो जीप १५० फूट खोल दरीत कोसळून भीषण अपघात झाला. सोमवारी (१२, फेब्रुवारी) रात्री १० वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. सुदैवाने या अपघातात कोणतीही जिवितहानी झालेली नाही.

याबाबत सविस्तर माहिती अशी की, पुण्याहून (Pune- Mahad Road) भोरमार्गे महाडकडे बोलेरो जीप निघाली होती. यावेळी वरंध घाटात शिरगांव गावाच्या हद्दीत चालकाला वळणावर रस्त्याचा अंदाज न आल्याने जीप रस्त्याच्या कडेला १५० फूट खोल दरीत कोसळली.

या घटनेची माहिती मिळताच ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेत चालकाला सुखरूप बाहेर काढले. सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झालेली नाही. जीप झाडी झुडपात अडकल्यानं सुदैवानं जीप चालक थोडक्यात बचावला. मात्र या अपघातात गाडीचे मोठे नुकसान झाले आहे.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

दरम्यान, या मार्गावरील रस्त्याचं डांबरीकरण झाले आहे. त्यामुळे गाड्यांचा वेग वाढलाय मात्र रस्त्याच्या कडेला संरक्षण कठडे नसल्याने तर काही ठिकाणी साईडपट्टी अरुंद असल्याने, रस्त्याचा अंदाज येत नाहीत. त्यामुळे ह्या मार्गावर वारंवार अपघाताच्या घटना घडत आहेत. (Latest Marathi News)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Yellow teeth: दात रोज घासूनही पिवळे दिसतात? फक्त ब्रश करणं पुरेसं नाही; 'ही' कारणं असू शकतात

Maharashtra News Live Update : पुणे पदवीधर मतदार संघासाठी हर्षदा देशमुख यांनी उमेदवारी अर्ज केला दाखल

ST Pass Online: एसटीचा मोठा निर्णय! 'आवडेल तेथे प्रवास' पास आता २ मिनिटात, बसस्थानकावर जायची गरज नाही, A टू Z माहिती

Drishyam 3 Box Office Collection: विजय साळगावकरची चाहत्यांमध्ये क्रेझ, रविवारी 'दृश्यम ३'ने केली इतक्या कोटींची कमाई

IAS तुकाराम मुंढे झाले 'रॉकस्टार'! 'द न्यू यॉर्क टाइम्स'च्या पहिल्या पानावर झळकले; काय आहे कारण?

SCROLL FOR NEXT