Pune Accident News  Saam TV
मुंबई/पुणे

Pune Accident News : माळशेज घाटात कार-पिकअपमध्ये भीषण अपघात, एअर बॅग उघडल्या तरी तिघांचा मृत्यू

Pune NEws : वाटखळ गावाजवळ पिकअप आणि इनोव्हा गाडीची समोरासमोर धडक झाली.

रोहिदास गाडगे

Accident News : जुन्नर तालुक्यात रस्ते अपघाताची मालिका सुरूच आहे. मागच्या आठवड्यात आळेफाट्याजवळील अपघातात पाच जणांचा मृत्यू झाला होता. ही घटना ताजी असतानाच मंगळवारी मध्यरात्री माळशेज घाट परिसरात असणाऱ्या वाटखळ गावाजवळ पिकअप आणि इनोव्हा गाडीची समोरासमोर धडक झाली.

कार आणि पिक अपची धडक एवढी भयंकर होती की, इनोव्हा गाडीत असणाऱ्या पाचपैकी तीन जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. या अपघातात पिकअप चालक थोडक्यात बचावला आहे. वाहनांचा वेग इतका प्रचंड होता की इनोव्हाची एअर बॅग तुटून बाजूला पडल्याचीही माहिती आहे. (Latest Marathi News)

इनोव्हा कार आळेफाटा तर पिकअप जीप कल्याणच्या दिशेने जात असताना इनोव्हाच्या चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटल्याने समोरून येणाऱ्या पीक अप जीपला तिने जोरात धडक दिली आहे. स्थानिक नागरिकांकडून घटनास्थळी बचावकार्य सुरु असुन मृतांची ओळख पटविण्याचे काम सुरू आहे

दरम्यान, नगर-कल्याण महामार्ग दिवसेंदिवस मृत्यूचा सापळा बनत चालला असून अपघातांच्या घटना मोठ्या प्रमाणावर वाढल्या आहेत. त्यामुळे हे अपघात रोखण्यासाठी प्रशासनाने वाहनचालकांकडून रस्ते नियमांची काटेकोर अंमलबजावणी करून घ्यावी, अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे.

रात्रीच्या वेळी प्रवास करताना अतिवेगाने गाडी चालवणे टाळावे. यामुळे तुमचा प्रवास अधिक सुरक्षित होईल. तसेच गाडीच्या विंडशील्ड नीट साफ करा. विंडशील्ड खराब असतील तर त्यामुळे रात्री गाडी चालवताना खूप त्रास होऊ शकतो. त्यामुळे रात्री गाडी चालवण्यापूर्वी आरसे नीट स्वच्छ करा.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Politics: काका चुकांवर पांघरुण घालायचे, दादांना शरद पवारांची आठवण का आली

आय लव्ह मोहम्मद आणि आय लव्ह महादेव; देशभरात रंगलेला बॅनर वाद आणि त्यामागची खरी कारणे

Maharashtra Politics : शिंदे गटाच्या नेत्याच्या मुलाला मारण्यासाठी ४ कोटींची सुपारी; पोलिसांत गुन्हा दाखल, राजकीय वर्तुळात खळबळ

Ladki Bahin Yojana: सरकारी लाडकीला दणका, 15 कोटी वसूल करणार

Belly Fat: पोटाची चरबी वाढलीये? फॉलो करा 'या' सोप्या टिप्स, पोटाचा घेर होईल कमी

SCROLL FOR NEXT