Property Of Mangaldas Bandal Seized By ED Saam Tv
मुंबई/पुणे

Pune News: पुण्यात ईडीची मोठी कारवाई, मंगलदास बांदल यांची ८५ कोटींची संपत्ती जप्त

Property Of Mangaldas Bandal Seized By ED: पुणे जिल्हा परिषदेचे माजी बांधकाम सभापती मंगलदास बांदल सध्या ईडीच्या रडारवर आहेत. त्यांची ८५ कोटींची संपत्ती ईडीने जप्त केली.

रोहिदास गाडगे

पुणे जिल्हा परिषदेचे माजी बांधकाम सभापती मंगलदास बांदल अडचणीत आले आहेत. मंगलदास बांदल यांच्याविरोधात ईडीने कारवाई केली. त्यांची तब्बल ८५ कोटी रुपयांची मालमत्ता ईडीने जप्त केली. मंगलदास बांदल उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे निकटवर्तीय असल्याचे मानले जाते. लोकसभा निवडणुकीवेळी सुनेत्रा पवार यांचा मंगलदास बांधल यांनी प्रचार केला होता.

मंगलदास बांदल यांची पुणे, सोलापूर, अहमदनगर जिल्ह्यात असलेली मालमत्ता ईडीकडून जप्त करण्यात आली होती. मनी लॉड्रिंग प्रकरणी मंगलदास बांदल यांच्या शिक्रापूर आणि महंमदवाडीतील निवासस्थानी ईडीने २१ ऑगस्ट रोजी छापे टाकले होते. त्यावेळी बांदल यांना अटक केली होती. ईडीने बांदल यांच्या निवासस्थानातून कागदपत्रे जप्त केली. बांदल यांच्या बँक खात्यांची माहिती ईडीच्या अधिकाऱ्यांनी घेतली. मंगलदास बांदल यांच्यासह हनुमंत शंभाजी खेमधरे, सतीश आणि यतिश जाधव यांचीही संपत्ती जप्त करण्यात आली आहे.

बांदल यांच्याविरुद्ध पुणे पोलिसांनी एका प्रसिद्ध सराफ व्यावसायिकाला धमकावल्याप्रकरणी मोक्का अंतर्गत कारवाई केली होती. बांदल यांच्याविरुद्ध शिवाजीराव भोसले बँक गैरव्यवहार प्रकरणी गुन्हा दाखल झाला होता. त्यामुळे आता मंगलदास बांदल यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. गेल्या अनेक महिन्यांपासून ते ईडीच्या रडारवर आहेत. आता ईडीने त्यांची मालमत्ता जप्त केली आहे. हे ईडीची सर्वात मोठी कारवाई म्हटले जात आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

'मराठीचाच अजेंडा'; कोणताच झेंडा नाही, ठाकरे बंधूंच्या विजयी मेळाव्याची निमंत्रण पत्रिका चर्चेत

रशियाच्या हल्ल्याने युक्रेन हादरलं, ट्रम्पसोबत चर्चेनंतर रशियाचा हल्ला; युक्रेनची राजधानी रशियाकडून उध्वस्त?

IND vs ENG Test 2 Day 3: All Out! सिराजच्या भेदक माऱ्यापुढे इंग्लंडची टीम ढेपाळली; भारताकडे 180 धावांची आघाडी

Sushil Kedia : आमच्यासारखा जर खरंच पेटून उठला तर...व्यावसायिक सुशील केडिया यांनी राज ठाकरेंना डिवचलं

ठाकरेंच्या मेळाव्याला काँग्रेस-राष्ट्रवादीची दांडी? ठाकरेंच्या मेळाव्यात मविआचा सहभाग? मराठीवरून मविआत फूट?

SCROLL FOR NEXT