Pune Water Supply Saam Tv
मुंबई/पुणे

Pune News: पुणेकरांसाठी खुशखबर! खडकवासला प्रकल्पातील पाणीसाठा दीडपटीने वाढला; वाचा ताजी आकडेवारी

5 TMC Water Storage In Khadakwasla Dam: पुणे शहरात खडकवासला धरण साखळी क्षेत्रामध्ये पूरक पाऊस झालाय. त्यामुळे धरणात एकूण पाच टीएमसी पाणीसाठा आहे.

Rohini Gudaghe

अक्षय बडवे, साम टीव्ही पुणे

पुणेकरांसाठी आता मोठी खुशखबर आहे. पुणे शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या धरण साखळी क्षेत्रामध्ये पूरक पाऊस पडला आहे. त्यामुळे खडकवासला धरण साखळी क्षेत्रामध्ये एकूण पाच टीएमसी पाणीसाठा झाला आहे. पावसाला सुरूवात झाल्यानंतर फक्त आठ दिवसांतच एकूण दीड टीएमसी पाणीसाठा वाढल्याचं समोर आलंय.

आठ दिवसांतच दीड टीएमसी पाणीसाठा वाढला

चारही धरणांमध्ये मिळून शहराला महिनाभर पुरेल एवढा पाणीसाठा सध्या शिल्लक (Pune News) आहे. खडकवासला, पानशेत, वरसगाव आणि टेमघर या चार धरणांमध्ये २६ जून या दिवशी ३.५० टीएमसी पाणीसाठा शिल्लक होता. हा पाणीसाठा बुधवारी ४.९९ टीएमसी झाला आहे. त्यामुळे सध्या पुणेकरांवरील पाणीसंकट दूर झाल्याचं चित्र आहे.

पुणेकरांमध्ये आनंदाचं वातावरण

पुणेकरांची २५ जूनपासून चिंता वाढली (Khadakwasla Dam Water Storage) होती. कारण शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या खडकवासला धरणातील पाणीसाठ्यामध्ये घट झाली होती. खडकवासला प्रकल्पाच्या चार धरणांमध्ये फक्त ३.५८ टीएमसी पाणीसाठा शिल्लक राहिला होता. त्यामुळे पुणेकरांना पाणीकपातीची टांगती तलवार होती. परंतु सध्या ही चिंता आता मिटली असल्याने पुणेकरांमध्ये आनंदाचं वातावरण आहे.

पाणीसाठ्यात आणखी वाढ होण्याची चिन्हे

राज्यात पुढील दोन दिवस जोरदार पाऊस होणार असल्याचा अंदाज पुणे वेधशाळेने वर्तवविला (Heavy Rain) आहे. पुण्यात देखील जोरदार पावसाचा इशारा वेधशाळेने दिलाय. त्यामुळे या पाणीसाठ्यात आणखी वाढ होण्याची चिन्हे दिसत आहे. पुढील दोन दिवस विदर्भ, मध्य महाराष्ट्र, खानदेश आणि कोकणात सर्वाधिक पाऊस होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे. मागील वर्षी पाऊस कमी झाल्यामुळे संपूर्ण राज्याला पाणीसंकटाला सामोरं जावं लागलं (Pune Water Supply) होतं.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi bhasha Vijay Live Updates : तुमच्याकडे न्याय मिळत नसेल तर गुंडगिरी करू, ठाकरेंचा फडणवीसांना टोला

Garja Maharashtra Maza : ठाकरेंच्या मेळाव्याची गर्जा महाराष्ट्र गीताने सुरूवात | VIDEO

Rava Puri Recipe : टिफीनमध्ये रोज चपाती कशाला? झटपट करा कुरकुरीत बटाटा पुरीचा नाश्ता

विजयी मेळाव्याला या मराठी कलाकारांची हजेरी, Photo पाहा

Marathi Vijay Melava: संपूर्ण लाईट बंद... इकडून उद्धव, तिकडून राज, ठाकरे बंधूंची ग्रँड एंट्रीने वरळी डोम दणाणला|VIDEO

SCROLL FOR NEXT