Pune Crime News Saam tv
मुंबई/पुणे

Pune Crime News: बारा दिवसात २० लाखांचे ५ कोटी; पाण्याच्या टाकीत पैसे टाकायांचे सांगून फसवणूक

Pune News : बारा दिवसात २० लाखांचे ५ कोटी; पाण्याच्या टाकीत पैसे टाकायांचे सांगून फसवणूक

Rajesh Sonwane

अक्षय बडवे 

पुणे : बारा दिवसात २० लाख रुपयांचे ५ कोटी रुपये करून देतो. असे सांगून पाण्याच्या टाकीत पैसे टाकायाला सांगितले. यानंतर रूममध्ये धूर करून पुण्यातील महिलेला २० लाख रुपयांना गंडा (Fraud) घातल्याचा प्रकार समोर आला आहे. पुण्यातील (Pune) मध्यवर्ती असलेल्या नारायण पेठेत ही घटना घडली आहे. (Latest marathi News)

पुणे शहरातील ४१ वर्षीय महिलेची विश्रामबाग पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. या फिर्यादीवरून तन्वीर पाटील, शिवम गुरुजी, सुनील राठोड, आनंद स्वामी अशा ४ जणांवर विश्रामबाग पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फिर्यादीचे व्यावसायिक भागीदार यांच्या प्लॉटच्या व्यवहारा निमित्त दोन (Crime News) महिन्यांपूर्वी तनवीर पाटील यांच्यासोबत ओळख झाली होती. पाटील येणे इतरांशी संगणमत करून तिघांना वीस लाख रुपयांचे पाच कोटी रुपये करून देतो असे आमिष दाखवले. या भूलथापाला बळी पडत या तिघांनी वीस लाख रुपये जमवले.

दरम्यान १३ सप्टेंबर रोजी २०० लिटरच्या बॅरेलमध्ये वीस लाख रुपये टाकण्यास सांगितले. त्यानंतर त्या रूमची लाईट बंद करून त्या ठिकाणी आरोपींनी धूर केला. फिर्यादीस ते हरिद्वार येथे जाऊन पूजा करून आल्यानंतर या वीस लाख रुपयांचे बारा दिवसात पाच कोटी होती असे सांगून हे चारही जण वीस लाख रुपये घेऊन निघून गेले. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच फिर्यादी यांनी पोलीस ठाणे गाठले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: सुप्रिया सुळे यांनी आंदोलन करणाऱ्या मुलींशी फोनवरून साधला संवाद

Ladki Bahin Yojana: लाडकी बहीण योजनेबाबत शिंदेंची मोठी घोषणा, मुख्यमंत्र्यांसमोरच स्पष्ट केली भूमिका

इंजिनिअरसह अख्ख्या कुटुंबाची गोदावरी नदीत उडी; 5 जणांच्या हत्येप्रकरणी कोचला अटक

Prajakta Mali Photos: प्राजक्ता माळीचे टॉप 10 फोटो, जे तुम्ही कधीच पाहिले नसतील

Mumbai News: 'भोजपुरी बोला, मगच जेवण मिळेल', मुंबईत परप्रांतीयांची दादागिरी; VIDEO व्हायरल

SCROLL FOR NEXT