Kothrud Pig Deaths Saam Tv
मुंबई/पुणे

Pune News: कोथरूडमध्ये ४७ डुकरांचा मृत्यू कसा झाला?, मृत्यूमागचं कारण आलं समोर

Kothrud Pig Deaths: कोथरूडमध्ये मृत पावलेल्या डुकरांचा अहवाल प्राप्त झाला आहे. काविळने या डुकरांचा मृत्यू झाला. त्यानंतर आता ७६ डुकरांना विलगीकरणात ठेवण्यात आले आहे.

Priya More

पुण्यातील कोथरूडमध्ये अचानक ४७ डुकरांचा मृत्यू झाला. डुकरांच्या अचानक मृत्यूमुळे खळबळ उडाली होती. एकापाठोपाठ एक डुकरांचे मृत्यू होत आहे. या डुकरांचा मृत्यू नेमका कशामुळे झाला यामागचे कारण समोर आले आहे. काविळमुळे डुकरांचा मृत्यू झाला आहे. मृत डुकरांचे शवविच्छेदन करण्यात आले त्यातून ही माहिती समोर आली आहे.

कोथरूडमध्ये मृत पावलेल्या डुकरांचा अहवाल प्राप्त झाला आहे. काविळने या डुकरांचा मृत्यू झाला. त्यानंतर आता ७६ डुकरांना विलगीकरणात ठेवण्यात आले आहे. कोथरूड येथे आठवड्याभरापेक्षा जास्त कालावधीपासून डुकरे मरत आहेत. राज्य शासनाच्या पशुसंवर्धन विभागाच्या तीन अधिकाऱ्यांच्या पथकाने प्रत्यक्ष पाहणी केली. मृत डुक्कर सापडे असता त्याच्या शवविच्छेदनातून काविळ सदृश आजाराने मृत्यू झाल्याचे समोर आहेत.

मृत डुकरांचे अवयव भोपाळ येथील प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत. महापालिकेने एका दिवसांत ७६ डुकरांना पकडून निरीक्षणात ठेवले असून २ दिवसांनी त्यांना कत्तलखान्यात पाठवले जाणार आहे. दरम्यान, कोथरूडमध्ये डुकरांचा मृत्यू होण्याच्या घटना थांबण्याचे नाव घेत नाहीत. रोज कोथरूडमध्ये डुक्कर मृतावस्थेत सापडत आहेत. पुणे महापालिकेने डुकरांच्या रक्ताचे नमुने तपासणी करण्यासाठी प्रयोगशाळेकडे पाठले होते.

कोथरूड पीएमपी डेपो येथील भारतीनगर तेथील नाल्यामध्ये गेल्या १० दिवसांपासून मृत डुकरे सापडत आहेत. महापालिकेकडून याकडे दुर्लक्ष केल्याने या परिसरात प्रचंड दुर्गंधी निर्माण झाली होती. तक्रार केल्यानंतर ही डुकरे उचलून नेण्यात आली आहेत. सातत्याने या परिसरात मृत डुकरे सापडत असल्याने याचे नेमके कारण काय? असा प्रश्‍न नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Stroke warning signs: स्ट्रोक येण्यापूर्वी तुमच्या शरीरात होतात 'हे' ६ बदल; सामान्य लक्षणं समजून दुर्लक्ष करू नका

Viral Video: 'सरपंच खाली उतरला...', विद्यार्थ्यांनी अडवला रस्ता; चिखलफेक करत.. व्हिडिओ व्हायरल

Tejswini Pandit: दिलखुलास हसणारी...; आईच्या निधनानंतर लेक तेजस्विनी पंडीतची पहिली भावनिक पोस्ट

Maharashtra Live News Update: वाशिम जिल्ह्यात 14 मंडळात अतिवृष्टी, हजारो हेक्टर शेतीचे नुकसान

नो पार्किंग क्षेत्रात कॅबिनेट मंत्र्याची कार; पोलिसांनी क्रेनने उचलून नेली, व्हिडिओ व्हायरल

SCROLL FOR NEXT