Pune Nira River News Saam Tv
मुंबई/पुणे

Pune News: पोहण्याचा नाद जीवावर बेतला! दम लागल्याने झाला अनर्थ; २५ वर्षाय तरुणाचा नीरा नदीत बुडून मृत्यू

Pune Nira River News: पोहता पोहता त्याला दम लागला, ज्यामुळे ही दुर्देवी घटना घडल्याचे समोर आले आहे..

Prachee kulkarni

Pune News: पवना धरण परिसरात फिरायला आलेल्या मुंबईच्या (Mumbai) तरुणाचा बुडून मृत्यू झाल्याची दुर्देवी घटना दोन दिवसांपूर्वी समोर आली होती. या दुर्घटनेतील तरुणाचा मृतदेह आज बाहेर काढण्यात आला. ही दुर्देवी घटना ताजी असतानाच एका मुलाचा नीरा नदीत बुडून मृत्यू झाल्याची दुर्देवी घटना समोर आली आहे. ज्यामुळे सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे..

याबाबत अधिक माहिती अशी की, भोर (Pune)) तालुक्यातील शिंद येथे पोहायला गेलेल्या तरुणाचा नीरा नदीच्या (Nira River) पाण्यात बुडून दुर्देवी मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. समोर आलेल्या माहितीनुसार भोर तालुक्याच्या महूडे खोऱ्यातील शिंद येथील तरुण निशिकांत संभाजी मोहिते (वय-२५ ) हा सोमवारी (ता. २४) दुपारी १२ च्या सुमारास नीरा नदी पात्रात पोहण्यासाठी गेला होता.

यावेळी पोहता पोहता त्याला दम लागला, ज्यामुळे तो पाण्यात बुडू लागला. या दुर्देवी घटनेत या तरुणाचा मृत्यू झाला. या घटनेने कुटूंबियांवर शोककळा पसरली असून परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. (Latest Marathi News)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: शेतकरी कर्जमाफसाठी शेतकऱ्यांंचं मंत्रालयाच्या बाजूला असलेल्या झाडावर चढून आंदोलन

Maharashtra Politics: मोठी बातमी! रायगडमध्ये भाजपच्या बड्या नेत्याविरोधात गुन्हा, राजकीय वर्तुळात खळबळ

Elephanta Caves : 'घारापुरी' लेणीला 'एलिफंटा' हे नाव कसं पडलं? कारण वाचून तुम्हीही व्हाल थक्क

उंची कमी असल्यास कपड्यांची निवड कशी करावी? जाणून घ्या 5 स्मार्ट स्टायलिंग टिप्स

8th Pay Commission: केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी गुड न्यूज! मूळ वेतनात होणार ५१००० रुपयांची वाढ? कसं असेल कॅलक्युलेशन?

SCROLL FOR NEXT