Pune School Boy Death Saam TV
मुंबई/पुणे

Pune News : मित्र डोळ्यादेखत खाणीत बुडाला, मुलांनी घरी सांगितलंच नाही; पुण्यातील हृदयद्रावक घटना

Pune School Boy Death : मित्रांसोबत पोहण्यासाठी गेलेल्या एका शाळकरी मुलाचा खाणीत बुडून मृत्यू झाला. ही दुर्देवी घटना पुणे शहरातील वारजे रामनगर परिसरात घडली.

Satish Daud

अक्षय बडवे, साम टीव्ही

मित्रांसोबत पोहण्यासाठी गेलेल्या एका शाळकरी मुलाचा खाणीत बुडून मृत्यू झाला. ही दुर्देवी घटना पुणे शहरातील वारजे रामनगर परिसरात घडली. दक्ष सुशांत कांबळे (वय १३) असे मृत्युमुखी पडलेल्या मुलाचे नाव आहे. याप्रकरणी वारजे पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, स्वातंत्र्यदिनी शाळेतील झेंडावंदनाचा कार्यक्रम आटोपल्यानंतर दक्ष आणि त्याचे मित्र वारजे (Pune News) भागातील रामनगर परिसरात असलेल्या एका खाणीत पोहण्यासाठी गेले होते. यावेळी काही मुलांनी पोहण्यासाठी पाण्यात उड्या घेतल्या.

दक्ष हा देखील मित्रांच्या मदतीने पाण्यात उतरला. पण त्याला पोहता येत नसल्याने तो बुडाला. दक्ष बुडू लागल्यानंतर त्याच्यासोबतची मुले घाबरून गेली. त्यांनी याबाबतची माहिती कोणालाही सांगितली नाही. तसेच घटनास्थळावरून देखील पळ काढला.

दरम्यान, सायंकाळपर्यंत दक्ष घरी न आल्याने घरच्यांनी शोधाशोध करून त्याच्या मित्रांकडे चौकशी केली. यावेळी दक्ष हा खाणीत पोहायला गेल्यावर पाण्यात बुडाल्याची माहिती एका मुलाने दिली.

मुलगा पाण्यात बुडाल्याचं कळताच आई-वडिलांच्या पायाखालची जमिनच सरकली. त्यांनी आरडाओरड करत खाणीच्या दिशेने धाव घेतली. स्थानिकांनी या घटनेची माहिती वारजे माळवाडी पोलिसांना दिली. पोलिसांनी अग्निशमन दलाच्या जवानांसह जवळपास दोन तास बोटीच्या माध्यमातून शोधकार्य केले.

रात्री सव्वा बारा वाजेच्या सुमारास खाणीतल्या पाण्यात दक्षचा मृतदेह आढळून आला. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी ससून रुग्णालयात पाठविण्यात आला. दक्ष हा शिवणे येथील नवभारत हायस्कूल या शाळेमध्ये इयत्ता सातवीमध्ये शिकत होता.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Politics: मोठी बातमी! ठाकरेंचा दिग्गज नेता आणि नगरसेवकाविरोधात गुन्हा, राजकीय वर्तुळात खळबळ

Maharashtra News Live Update: सोयाबीनचे बियाणे विक्री करणाऱ्या 'बूस्टर' कंपनीविरोधात अमरावतीत गुन्हा

SET Exam Update : विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी! SET परीक्षा पुढे ढकलली, नेमकं कारण काय? कधी होणार परीक्षा? वाचा A to Z अपडेट्स

Sindhudurg Tourism : मालदीव विसरा! महाराष्ट्रातच आहे 'हा' निसर्गरम्य समुद्रकिनारा, पावसाळ्यात दिसतं आरशासारखं निळेशार पाणी

Salman Khan : सलमान खानने विकले मुंबईतील आलिशान घर; किती कोटींमध्ये झाली डील, आकडा पाहून व्हाल चकित

SCROLL FOR NEXT