ज्ञानेश्वर हिंगोलीकर, साम टिव्ही
Pune Navratri Festival 2022 : नवरात्रीचा उत्सव काही दिवसांवर येऊन ठेपलाय. मात्र, त्याआधीच पुणे (Pune) शहरातून एक धक्कादायक प्रकार उघडकीस आलाय. पुण्यात नवरात्र उत्सावाच्या (Navratri Festival) निमित्ताने तरुणांना लैंगिक प्रशिक्षण देण्यात येणार आहे. या प्रशिक्षणासाठी ऑनलाईन नावनोंदणी सुरू झाली आहे. माहितीनुसार, सत्यम शिवम् सुंदरम् या फाउंडेशनच्या वतीने 'सेक्स तंत्र' नावाने ही नावनोंदणी करण्यात येत आहे. दरम्यान, ही बाब उघडकीस येताच हिंदू महासंघाने आक्रमक भूमिका घेतली आहे. (Pune Navratri Festival Physical Relations Training Camp)
नवरात्र उत्सवाच्या निमित्ताने तरुणांना लैंगिक प्रशिक्षण देण्यासंदर्भातील जाहिरात आणि मेसेज सध्या सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल झाले आहे. या लैंगिक शिबिराचे आयोजन १ ते ३ ऑक्टोबर दरम्यान करण्यात येणार असल्याची माहिती आहे. विशेष बाब म्हणजे यामध्ये तरुणांसह तरुणीही सहभाग घेणार असल्याचं सांगण्यात आलं आहे. या लैंगिक प्रशिक्षण केंद्रात ध्यानधारणा कशी करावी आणि कामसूत्रातील लैंगिक क्रिया या संदर्भात प्रशिक्षण दिले जाणार आहे.
धक्कादायक बाब म्हणजे, या प्रशिक्षण शिबीरासाठी प्रत्येकी १५ हजार रुपये इतकी फीस आकारली जाणार आहे. ही बाब उघडकीस येताच हिंदू महासंघाने यावर आक्षेप घेतला आहे. या विकृत शिबीराला नवरात्री स्पेशल असं नाव दिलं गेलं, हा हिंदूंचा आणि त्यांच्या दैवतांचा अपमान आहे. हे हिंदू महासंघ कदापि सहन करणार नाही, असा इशारा हिंदू महासंघाचे आनंद दवे यांनी दिला आहे. (Pune Todays News)
'या शिबीरात ना आयोजकांचा पत्ता, ना नावे, ना होणाऱ्या कार्यक्रमाचा पत्ता किंवा इतर कोणतीही माहिती नाहीये. यावरूनच हे सर्व फसव, घाणेरडे आणि एका नवीन विकृत संस्कृती ला जन्म देणारे ठरणार आहे आणि हिंदू महासंघ हे होऊ देणार नाही. उद्या शुक्रवारी दुपारी 12 वाजता आम्ही CP ऑफिसवर या बाबतचे निवेदन देण्यासाठी जाणार असून या विकृती ला रोखण्यासाठी जे जे करावे लागेल ते ते आम्ही करू', असंही आनंद दवे यांनी म्हटलं आहे.
Edited By - Satish Daud
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.