pune news  Saam tv
मुंबई/पुणे

नरसारापूर प्रकरणात धक्कादायक माहिती उघड; नराधम भीमराव कांबळने सगळं सांगितलं, आज गावकऱ्यांकडून बंदची हाक

pune nasrapur case : नरसापूर प्रकरणात धक्कादायक माहिती उघड झालीये. या प्रकरणात आरोपी भीमराव कांबळने पोलिसांना सगळं सांगितलं आहे.

Vishal Gangurde

नरसापूर प्रकरणाने राज्यात संतापाची लाट

आरोपी भीमराव कांबळेवर कठोर कारवाईची मागणी

आरोपीकडून पोलिसांच्या चौकशीत गुन्ह्याची कबुली

सागर आव्हाड, साम टीव्ही

नरसापूर चिमुकली अत्याचार प्रकरणाने महाराष्ट्र हादरला आहे. चार वर्षांच्या चिमुकलीवर अत्याचार करून दगडाने ठेचून हत्या करणाऱ्या नराधमाच्या विरोधात संतापाची लाट उसळली आहे. आरोपी भीमराव कांबळेने पोलिसांसमोर गुन्हा कबुल केला आहे. नराधम कांबळेची नेहमीच लहान मुलींवर वाईट नजर असल्याचंही पोलीस तपासातून समोर आलं आहे. भीमराव कांबळे विकृत असल्याचंही पोलीस तपासातून सिद्ध झालं आहे.

पीडित चिमुकलीच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्याआधी संतप्त नागरिकांनी रस्ता अडवून ठेवला होता. मात्र, पोलिसांनी समजूत काढल्यानंतर नागरिक रस्त्यातून बाजूला झाले. त्यानंतर नागरिकांनी चिमुरडीवर रात्री उशिरा पुण्यातील वैकुंठ स्मशानभूमीत अंत्यसंस्कार केले. अंत्यसंस्काराच्या वेळी पोलिसांचा मोठा बंदोबस्त होता. आरोपी भीमराव कांबळेला लवकरात लवकर कठोर शिक्षा व्हावी, अशी पीडितेच्या कुटुंबीयाची मागणी आहे.

पीडित चिमुकलीचा पाठलाग करतानाचा आरोपीचा सीसीटीव्ही देखील समोर आला आहे. आरोपी पोलिसांच्या ताब्यात असून त्याची कसून चौकशी सुरू आहे. पोलिसांच्या चौकशीत त्याने गुन्हा कबुल केला आहे. त्याच्या चौकशीतून भीमराव कांबळे विकृत असल्याचे समोर आलंय. या प्रकरणाची राष्ट्रीय महिला आयोगानेही दखल घेतली आहे.

नॅशनल कमिशन फॉर प्रोटेक्शन ऑफ चाइल्ड राइट्स यांनीही या प्रकरणाची दखल घेऊन तपासावर देखरेख ठेवण्याचे आणि दोषींना कठोर शिक्षा मिळावी, यासाठी आवश्यक कारवाई करण्याचे आवाहन आयोगाकडून करण्यात आलं आहे. पीडित कुटुंबाला तातडीने मदत आणि नुकसान भरपाई देण्यासाठी आयोगाकडून प्रयत्न करण्यात येत आहे. आरोपीवर वेळेत आरोपपत्र दाखल करणे आणि फास्ट ट्रॅक न्यायालयात जलद सुनावणी सुनिश्चित करण्यावरही आयोगाकडून भर असणार आहे.

भोर, राजगड तालुका बंदची हाक

चिमुकलीच्या न्यायासाठी आज भोर, राजगड तालुका बंदची हाक देण्यात आली आहे. चिमुरडीवरील अन्यायाविरोधात आज रविवारी संपूर्ण भोर, राजगड तालुका बंदची हाक देण्यात आली आहे. नराधमाला फाशी द्या, या मागणीसाठी सर्व स्तरांतून नागरिक रस्त्यावर उतरले असून व्यापारी आणि दुकानदारांनीही आपली दुकाने बंद ठेवून या निषेधात सहभाग नोंदवण्याचे आवाहन करण्यात आलं आहे. हवेली, भोर वेल्हामधील आंबेडकरी संघटनांच्या वतीने खेड शिवापूर टोल नाका बंदची हाक देण्यात आली आहे.

भोरमधील बंदला व्यापारी आणि स्थानिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

भोर बंदला व्यापारी आणि स्थानिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद देण्यात आला आहे. पुण्यातील भोर, राजगड तालुक्यात आज रविवारी कडकडीत बंद पुकारण्यात आला आहे. तालुक्यातील सर्व व्यापारी असोसिएशन, दुकानदार आणि नागरिक यांच्याकडून कडकडीत बंदचे आवाहन करण्यात आलं आहे. बंदच्या आवाहनाला दुकानदारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला आहे. नराधमाला तात्काळ फाशीची शिक्षा व्हावी, या मागणीसाठी बंद पाळण्यात आला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

India Fort : किल्ल्यातच वसलंय अर्ध शहर, जगातील 'हे' अनोखं ऐतिहासिक ठिकाण पाहिलंय का?

Maharashtra News Live Update: नागपूरमध्ये ट्रॅक्टर पुलावरून नदीत कोसळला, एकाचा जागीच मृत्यू

Online Rent Agreement : घरमालक आणि भाडेकरूंनी ऑनलाइन भाडेकरार कसा करावा? जाणून घ्या संपूर्ण प्रक्रिया

Farmer Loan Waiver Scheme: मयत शेतकऱ्यांच्या वारसांनाही कर्जमुक्तीचा लाभ मिळणार, सरकारचा मोठा निर्णय

पांढरे कपडे पुन्हा नव्यासारखे चमकवा! पिवळे डाग घालवण्यासाठी ‘या’ ५ स्मार्ट ट्रिक्स वापरा

SCROLL FOR NEXT