उन्हाळ्यात ट्रेनसाठी होणारी अतिरिक्त गर्दी कमी होईल.
समर स्पेशल ट्रेन सुरू झाल्या आहेत.
आता पुण्याहून नागपूरला तुम्ही अधिक जलद गतीने पोहचाल.
मे महिना येताच पिकनिकचे वारे वाहू लागतात. मे महिन्यात मुलांच्या शाळेला सुट्टी असते. त्यामुळे अनेक फॅमिली ट्रिपचे प्लान बनतात आणि ट्रिप म्हटले की, प्रवास आला. रस्त्यावरही वाहतूक कोंडी जास्त होते. त्यामुळे नागरिक रेल्वेचा मार्ग निवडतात. पण सुट्ट्यांमध्ये रेल्वेचे तिकीट मिळणेही कठीण होते. पण आता पुण्याहून नागपूर प्रवास अधिक जलद आणि सुखकर होणार आहे.
पुणे विभाग मध्य रेल्वेतर्फे बनारससाठी एकमार्गी विशेष गाड्या आणि नागपूरसाठी वीकेंड विशेष गाड्या चालवल्या जाणार आहेत. उन्हाळ्यात प्रवासादरम्याम नागरिकांची अतिरिक्त गर्दी कमी करण्यासाठी, मध्य रेल्वेने पुणे (हडपसर) ते बनारस एकमार्गी उन्हाळी विशेष गाडी, तसेच पुणे आणि नागपूरला जोडणारी वीकेंड विशेष गाडी चालवण्याचा निर्णय घेतला आहे.
इंडियन रेल्वेच्या चौकशी पोर्टल www.enquiry.indianrail.gov.in ला भेट देऊन किंवा अधिकृत NTES ॲप डाउनलोड करून मार्गावरील सर्व स्टेशन्स आणि त्यांची वेळ तुम्ही एकदा तपासून घ्या. जेणेकरून प्रवास सोयीस्कर होईल आणि आताच ट्रिपचे प्लान करा. उन्हाळी सुट्टींचा आनंद घ्या. विशेष गाड्यांचा तपशील खालीलप्रमाणे-
हडपसर (पुणे) – बनारस एकमार्गी विशेष
गाडी क्रमांक ०१४५३ हडपसर – बनारस विशेष गाडी गुरुवार (३०.०४.२०२६) रोजी सकाळी ०७:५० वाजता हडपसरहून सुटेल आणि दुसऱ्या दिवशी शुक्रवार (०१.०५.२०२६) दुपारी १३:५० वाजता बनारसला पोहोचेल.
स्टेशन्स : दौंड दोरमार्ग, अहिल्यानगर (अहमदनगर), कोपरगाव, अंकाई, मनमाड, भुसावळ, खंडवा, इटारसी, जबलपूर, कटनी, सतना, माणिकपूर, प्रयागराज आणि ज्ञानपूर रोड.
कंपोझिशन वन-वे स्पेशल (22 डबे) : ही ट्रेन अमृत भारत उद्घाटन स्पेशल रेकसह धावेल ज्यामध्ये 08 स्लीपर क्लास (LWSCNPP), 11 जनरल सेकंड क्लास (LWSPP), 01 पँट्री कार (LWCBPP) आणि 02 गार्ड/लगेज व्हॅन (LSLRDPP) यांचा समावेश असेल.
नागपूरसाठी वीकेंड समर स्पेशल गाड्या
पुणे – नागपूर – पुणे वीकेंड स्पेशल (०२ फेऱ्या)
गाडी क्रमांक ०१४६७ पुणे – नागपूर स्पेशल शुक्रवार (०१.०५.२०२६) रोजी पुण्याहून १५:५० वाजता (०१ फेरी) सुटेल आणि दुसऱ्या दिवशी शनिवारी ०८:०५ वाजता नागपूरला पोहोचेल.
गाडी क्रमांक ०१४६८ नागपूर – पुणे स्पेशल रविवार (०३.०५.२०२६ ) रोजी नागपूरहून ०७:०० वाजता (०१ फेरी) सुटेल आणि त्याच दिवशी २३:३० वाजता पुण्याला पोहोचेल.
स्टेशन्स : उरुळी, दौंड कॉर्ड लाईन, अहिल्यानगर (अहमदनगर), बेलापूर, कोपरगाव, अंकाई, मनमाड, जळगाव, भुसावळ, मलकापूर, शेगाव, अकोला, बडनेरा, धामणगाव आणि वर्धा.
१ एसी २-टियर, १ एसी ३-टियर, १२ स्लीपर क्लास, ०४ जनरल सेकंड क्लास आणि ०२ गार्ड/लगेज व्हॅन (एकूण २० आयसीएफ डबे) असतील.
पुणे विभाग मध्य रेल्वेतर्फे सोडल्या जाणाऱ्या विशेष गाड्यांचे आरक्षण, तिकीट तपशील जाणून घेऊयात. जेणेकरून तिकीट बुक करणे तुम्हाला अधिक सोयीचे होईल.
ॲडव्हान्स बुकिंग
विशेष गाड्यांसाठी विशेष शुल्कावरील बुकिंग २९.०४.२०२६ रोजी सर्व पीआरएस तिकीट काउंटरवर आणि आयआरसीटीसीच्या वेबसाइटवर (www.irctc.co.in) सुरू होईल.
अनारक्षित (Unreserved) प्रवास
गाड्यांमधील जनरल सेकंड क्लास (GS/LWSPP) आणि गार्ड/लगेज व्हॅन (SLRD/LSLRDPP) हे अनारक्षित डबे म्हणून धावतील. या डब्यांची तिकिटे UTS प्रणालीद्वारे (UTS ॲप आणि बुकिंग काउंटर) सुपरफास्ट/मेल/एक्स्प्रेस गाड्यांसाठी लागू असलेल्या सामान्य शुल्कासह बुक करता येतील.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.