Pune Municipal Job Scam: Former Jejuri Trustee Rajendra Khedekar Arrested saam tv
मुंबई/पुणे

पुणे महापालिका नोकरभरती घोटाळा प्रकरणात मोठी कारवाई; जेजुरी देवस्थानच्या माजी विश्वस्ताला अटक

Pune Municipal Corporation Job Fraud Case: पुणे महापालिका बनावट नोकरभरती प्रकरणात जेजुरी देवस्थानचे माजी विश्वस्त राजेंद्र खेडेकर यांना शिवाजीनगर पोलिसांनी अटक केली. बनावट नियुक्तिपत्रे आणि कागदपत्रांच्या माध्यमातून बेरोजगार तरुणांची फसवणूक केल्याचा आरोप आहे.

Akshay Badve

  • राजेंद्र खेडेकर यांना शिवाजीनगर पोलिसांनी अटक केली.

  • खेडेकर हे जेजुरी देवस्थानचे माजी विश्वस्त असल्याचे सांगण्यात येत आहे.

  • नावट नियुक्तिपत्रे, महापालिकेचे बनावट शिक्के आणि कागदपत्रे वापरल्याचा पोलिसांचा आरोप

पुणे महापालिकेत बनावट नोकर भरती प्रकरणी शिवाजीनगर पोलिसांनी मोठी कारवाई केलीय. या बनावट नोकरभरती घोटाळ्याचा मास्टरमाइंड डॉ. राजेंद्र बबनराव खेडेकर याला शिवाजीनगर पोलिसांनी मंगळवारी (ता. २९) अटक केली. खेडेकर हा जेजुरी देवस्थानचा माजी विश्वस्त असून, या प्रकरणात यापूर्वी सात आरोपींना अटक केली आहे.

खेडेकर हा पुणे महानगरपालिकेत विविध पदांवर कायमस्वरूपी नोकरी मिळवून देण्याचे आमिष दाखवून सुशिक्षित बेरोजगारांची फसवणूक केली होती. महापालिकेत नोकरी लावण्याचे आमिष दाखवून शेकडो युवकांकडून कोट्यवधी रुपये उकळल्याचा आरोप त्याच्यावर आहे. दोन महिन्यांपासून फरार असलेल्या खेडेकरला अटक केल्यानंतर न्यायालयात हजर करण्यात आले.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी मार्च २०२२ ते जुलै २०२६ या कालावधीत महापालिकेतील विविध जागांवर नोकरी लावून देण्याच्या बहाण्याने राज्यातील अनेक बेरोजगार तरुणांना जाळ्यात ओढले होते. महापालिकेच्या नावाचे खोटे शिक्के, बनावट नियुक्तिपत्रे आणि अधिकृत भासणारी कागदपत्रे तयार करून या तरुणांकडून कोट्यवधी रुपयांची रोकड उकळल्याचा आरोप आहे. याप्रकरणी १९ जुलै रोजी राजेंद्र खेडेकर आणि महापालिकेच्या शिक्षण विभागातील दोन कर्मचाऱ्यांसह आठजणांविरुद्ध शिवाजीनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

या प्रकरणात अटक टाळण्यासाठी खेडेकरने पुणे सत्र न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी अर्ज दाखल केला होता. परंतु गुन्ह्याचे स्वरूप गंभीर असून, यामागे मोठे रॅकेट असल्याचा युक्तिवाद सरकारी पक्षाकडून करण्यात आला होता. हा युक्तिवाद ग्राह्य धरत न्यायालयाने खेडेकरचा जामीन अर्ज फेटाळला होता. खेडेकर हा जेजुरी देवस्थान विश्वस्तपदी कार्यरत होता. परंतु या प्रकरणात गुन्हा दाखल झाल्यानंतर, जेजुरी देवस्थानने खेडेकरला विश्वस्त पदावरून हकालपट्टी केली होती.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार उद्या दिल्ली दौऱ्यावर

Gold Rate Today: दसऱ्याच्या दिवशी सोन्याच्या दरात मोठी घसरण, १० तोळा ८,७०० रुपयांनी स्वस्त; वाचा 18k- 22k आणि 24k चे दर

भाजपवर कोसळला दु:खाचा डोंगर; बड्या नेत्याच्या निधनाने राजकारणात हळहळ

Gokul Election Result: गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीत महायुतीला झटका, सतेज पाटील यांच्या एकाकी झुंजेला यश, वाचा विजयाची इनसाईड स्टोरी

Heart Blockage: लिंबू-आल्याचं पाणी प्यायल्याने हृदयाच्या रक्तवाहिन्यांमधील चरबी कमी होते? डॉक्टरांनी सांगितलं सर्जरीशिवाय कसे ठीक कराल ब्लॉकेज?

SCROLL FOR NEXT