BJP leaders during Pune Municipal Corporation meeting as focus shifts to Standing Committee president post. saam tv
मुंबई/पुणे

Pune Municipal: महापौर, गटनेता ठरलं, पुणे महापालिकेच्या स्थायी समितीचे अध्यक्षपद कोणाला? भाजपमध्ये "फिल्डिंग" सुरू

Pune Municipal Corporation : महापौर आणि गटनेतेपदे मिळवल्यानंतर, पुणे महापालिकेतील महत्त्वाच्या स्थायी समिती अध्यक्षपदासाठी फिल्डिंग सुरू झालीय. राजकीय पटलावर स्थायी समितीच्या अध्यक्षपदाची कोणाची वर्णी लागणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे.

Akshay Badve

  • महापौर, उपमहापौर आणि गटनेत्याची निवड पूर्ण

  • आता स्थायी समितीच्या अध्यक्षपदाकडे सर्वांचे लक्ष लागलंय.

  • १२ सदस्यांतून स्थायी समिती अध्यक्ष निवडला जाणार आहे.

तब्बल ११९ जणांचे बलाबल घेऊन भाजप ने पुणेअपलिकेवर झेंडा रोवला. महापालिकेची सत्ता भाजपला मिळाल्यानंतर महापौर, उपमहापौर आणि पक्षाकडून गटनेतेपदाची नावं निश्चित करण्यात आली. आता या तीन प्रमुख नावांची निवड झाल्यानंतर आता विविध समित्यांच्या पदनिवडीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. पुणेकरांनी दाखवलेल्या विश्वासाला न्याय देण्याचे मोठे आव्हान भाजपसमोर उभे आहे. ११९ जणांपैकी या जागांवर कोणाची वर्णी लावायची असा प्रश्न पक्षासमोर नक्की उभा राहणार आहे.

भाजपकडून महापौरपदी मंजुषा नागपुरे तर उपमहापौरपदी आरपीआयचे परशुराम वाडेकर यांची निवड निश्चित झाली तर गटनेतेपदी गणेश बिडकर यांची नियुक्ती करण्यात आली. या निवडीमुळे महापालिकेतील सत्ता समीकरणे स्पष्ट झाले असले तरी आता लक्ष लागलं आहे ते म्हणजे स्थायी समितीकडे. राजकीय पटलावर स्थायी समितीच्या अध्यक्षपदाची कोणाची वर्णी लागणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे.

पक्षातील १२ नगरसेवकांना स्थायी समितीच्या सदस्यपदी संधी मिळणार असून, त्यातूनच अध्यक्ष निवडला जाणार आहे. सर्व आर्थिक निर्णय स्थायी समितीमार्फत घेतले जात असल्याने या समितीचे अध्यक्षपद महापालिकेत अत्यंत महत्त्वाचे मानले जाते. स्थायी समितीच्या अध्यक्षपदासाठी सध्या श्रीनाथ भिमाले, बॉबी उर्फ अनिल टिंगरे, धीरज घाटे, राजेंद्र शिळीमकर यांची नावं आघाडीवर असल्याच्या चर्चा आहेत.

गेल्या चार वर्षांपासून पुणे महानगरपालिकेवर प्रशासक राज होता. मात्र आता स्पष्ट बहुमतासह सत्तेवर आलेल्या भाजपसमोर शहरातील प्रलंबित तसेच येणाऱ्या काळातील विकासाची अनेक प्रकल्प पूर्ण करण्याचं मोठे आव्हान असणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुणेकरांना विकासाची अनेक आश्वासने दिली आहेत.

यामध्ये प्रामुख्याने शहरातील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी नवीन रस्ते उभारणे, सार्वजनिक वाहतूक व्यवस्था सक्षम करणे, पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सोडवणे आणि मूलभूत नागरी सुविधा सुधारण्याचे आश्वासन देण्यात आले होते. या सर्व गोष्टी पुढे नेण्यासाठी महापालिकेतील स्थायी समितीचे निर्णय आणि त्यांच्याकडून होणाऱ्या कामाची अंमलबजावणी महत्वाची ठरणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: ‘सहयोग’ या निवासस्थानी राज्यभरातून दादांवर प्रेम करणारे पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच असंख्य नागरिक उपस्थित

Saturday Horoscope: जुनी नाती पुन्हा जुळतील, कामात बढतीचे योग; वाचा शनिवारचे राशीभविष्य

T20 World Cup : टीम इंडियाला मोठा झटका, ऑलराउंडर खेळाडू होणार बाहेर; स्टार खेळाडूची एन्ट्री कन्फर्म

मुख्यमंत्र्यांच्या मेकअपसाठी 4 कोटींचा निधी, सरकारी पैशातून मेकअप

मोठी बातमी! मॉस्कोमध्ये संरक्षणमंत्र्यांची हत्या, इमारतीत घुसून हल्लेखोराकडून गोळीबार

SCROLL FOR NEXT